Posts

Showing posts from December, 2020

संस्कृती लयास का जातात?

Image
"शेवटी जनता राजकारण्यांचं ऐकते, ती कवीचं म्हणणं मनावर घेत नाही म्हणून जनजीवन ध्वस्त होतं, संस्कृती लयास जातात."  - जोनास मेकास “In the very end, civilizations perish because they listen to their politicians and not to their poets.”  - Jonas Mekas      

स्वप्न

 मी, जॉर्ज ऑर्वेल आणि टी. एस. एलियट एका मोठ्या खाटेवर एकमेकांशेजारी पहुडलो होतो. जाड पांघरुणातही थंडी वाजत होती. ही खाट नेमकी कुठे असावी? वर खुलं आकाश होतं, भवती अंधार. आम्ही वाळवंटात आहोत असं वाटत होतं. इतरांना विचारण्याची, वा स्वतः उठून खात्री करून घेण्याची इच्छाच होत नव्हती. माझ्या पाठीमागं ऑर्वेल आणि एलियट एकमेकांकडे तोंड करून बोलत होते. मी शेजारच्या खाटेवर शाल लपेटून, पाय छतीशी मुडपून बसलेल्या आमच्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांशी गप्पा मारत होते. मागून येणारा आवाज बंद झाला. दोघे झोपी गेले असावेत. बऱ्याच वेळाने ऑर्वेल म्हणाले, "जरा इकडे बघ." मी मागं वळून पाहिलं. ऑर्वेल एलियटकडे एकटक पाहत होते. त्यांनी माझा हात हातात घेऊन एलियटच्या मनगटाला लावला - नाडी बंद पडली होती. मग मी व ऑर्वेल शांतपणे झोपी गेलो. डोळे मिटण्यापूर्वी मी शेजारच्या खाटेवर नजर टाकली -  गुढघ्यांवर हनुवटी टेकवून आमचे प्राध्यापक विचारांत पार गढले होते.

सुहाना सा कोहरा छाया रहता था उन दिनों

 मूल मराठी काव्य: श्वेता पाटोळे(ले)   सुहाना सा कोहरा छाया रहता था उन दिनों हमारें दरमियाँ | नाम-पता-रंग-ढंग की जब कोई संभावना न थी... आपस में पाए चंद निशानों से लिपटा कोहरा | उम्मीदभरा, दिलचस्प, गुलाबी, गहरा, बेकरार-सा, दिलकश... 'मेरेपन'की, 'तुम्हारेपन'की  सारीं परिधिओं को समा लेने वाला; जाने पहचाने से भुलावों में ला कर हठात् अनजान बन जाने वाला; कुछ कुछ समझा सा लगने पर उलझने-उलझाने वाला | अज्ञात के साथ चलते  चल रही खुद की तलाश | नए सिरे से हो रहा खुद का परिचय | शायद तुम मौजूद थे उस तलाश में या एहसास था बस, तुम्हारे मौजूदगी का | तुमने भी नए सिरे से पाया खुद को, शायद, मेरे मौजूदगी के एहसास में |   फिर न जाने कब, किस पल से तुम्हारा परिचय खुद के परिचय से ज्यादा ज़रूरी हो बैठा..? क्यों सब कुछ आज़माया, लाख कोशिशें की इस परिचय को पाने की?   हम्म..?   ..आखिरकार हमारी जान-पहचान हो गई | पर ठीक उसी वक़्त छट गया,  पिघल गया वो कोहरा | पाएं जा सकते थे जो रुख़ नए - गुम गए, कोहरे की ही तरह... आज भी हम साथ चल रहें हैं, पर अब कोई प्रत्याशा नहीं, दिल में कोई हल...

राहें

  राहें   मूल मराठी काव्य: पद्मा गोळे(ले)      खोयी हुईं राहें भटकी हुईं राहें रायज सी राहें पहलीं थाम लेती है एक हाथ तो दूसरीं, दूसरा और कहती हैं तीसरीं खींचकर पाँव, 'बस अब यहीं पड़ जाव' |

तुमपर लिखी कविताएं

 तुमपर लिखी कविताएं   मूल मराठी काव्य: संदीप खरे     मेरा घर, तुम्हारा घर माना अलग अलग शहरों में दोनों अलग अलग देशों में बसे हैं | फिर भी नक़्शे में सही उन्हें जोड़नेवाली काल्पनिक रेखाएं खींची जा सकती है न? इन्हीं रेखाओं को मैं 'तुमपर लिखी कविताएं' कहता हूँ |

Why not read the tree firsthand?

 Originally written in Marathi by Vasant Abaji Dahake   To cut a tree To make logs To chop them into flakes To pulp, press and mould them into paper Upon which to write, or print Thereafter to read ... Why so much ado? Why not read the tree firsthand?

सातवां

  सातवां   मूल मराठी काव्य: वि. वा. शिरवाडकर 'कुसुमाग्रज'     चम्मच-धानी में सात चम्मच टंगे थें | एक रोज़ एक चम्मच न जाने कहाँ खो गया | बचे छहों के गलों से सहसा बेरोक सिसकी फूटी | "वो होती तो", सुबकते हुए वे बोलें, "वह न खोता" |  न जाने कैसे काबू खो कर मैॆ सातवां चम्मच बन गया, उसकी ख़ाली जगह ले कर   छहों की सिसकनों में शरीक हुआ और बुदबुदा गया: "सच कहा दोस्तों, वो होती तो मैं न खोता"|

'प्रत्येकाला स्वयंपाकातले काही अजब कौशल्य प्राप्त असते' - दुर्गा भागवत

मोदकांसंबंधी लिहिताना दुर्गाबाई सांगतात:   '...आमच्याकडे स्वयंपाकाला एक बाई होत्या. (त्यांची आई लहानपणीच वारली, त्या एका इस्पितळात आश्रित म्हणून वाढल्या. रूपाने देखण्या परंतु अस्थिर बुद्धीच्या असल्यामुळे पुढे नवऱ्याने त्यांना टाकले.) त्या माझ्या आत्याच्या घरी नोकरीला राहिल्या. या बाईंचे सारे काम दिव्य असे. उत्तराला प्रत्युत्तर ठरलेलं.  त्या मोदक अतिशय सुरेख करायच्या. मी मोदक त्यांच्याकडून शिकले. पीठ दळण्यापासून सारे त्या करायच्या. बारीक पिठी दळण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. एकावर एक तीन मोदक कसे करायचे ते त्यांनी मला शिकवलं: एक बरीच मोठी पारी करायची. पहिल्यांदा सर्वात खालच्या मोदकाचे कंगोरे काढायचे, सारण भरून तो मिटवताना बरंचसं पीठ वर येतं. त्या पिठाचा पहिल्यापेक्षा लहान मोदक करायचा. उरलेल्या पिठाचा तसाच वर तिसरा मोदक करायचा. तीन-तीन मोदकांच्या अशा चार उतरंडी करून गणपतीच्या मखराच्या चारी बाजूंना मांडायच्या. हे कसब मी पहिल्यांदा त्यांच्याकडे पाहिलं, आणि माझ्या कुवतीप्रमाणे हस्तगतही केलं.  प्रत्येक व्यक्तीला, बाई असो वा बुवा, स्वयंपाकातले काही ना काही अजब कैशल्य प्राप्त असते...

दुर्गाबाई सांगतात पशुपक्षी व मानवी पाकशास्त्राचं नातं..

विस्मरणात चाललेल्या मराठी पाककृती व एकंदर पाकवैविध्यासंबंधी दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेले लेख 'खमंग' या शीर्षकाखाली पुस्तकरुपाने संकलित करण्यात आले. पशुपक्षी व मानवी पाकशास्त्राचं नातं दर्शवणारे दोन-तीन दाखले बाईंनी दिलेत. आवर्जून वाचावे:   ...दोन प्राण्यांनी माणसाच्या पाकज्ञानात भर घातली आहे: अस्वल व माकड.  दक्षिणेकडे अस्वलं मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे अस्वल शाकाहारी असतं. त्याचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं. वसंतात झाडांना फुलं धरली, की अस्वलं हरतऱ्हेची सुवासिक फुलं गोळा करतात. मधाची पोळीदेखील उतरवतात. ही पोळी व फुलं एकत्र करून पायाने वा काठीने तुडवतात. या काल्याला 'अस्वलाचं पंचामृत' म्हटलं जातं. ते अत्यंत पौष्टिक असतं. माणसालाही ते आवडतं, व ते हस्तगत करण्यासाठी अस्वलांची शिकार केली जाते.  ..अस्वलाने शिकवलेला हा पदार्थ मी (घरी) करून पाहिला. बरीच वासाची फुलं व खूपसा मध घालून मी ते केलं. काहीजण कृत्रिम चवींना इतके सवकलेले असतात, की त्यांना हा पदार्थ रुचला नाही. मी मात्र तो आवडीने खाल्ला.   माकडाकडून मानवजातीला मिळालेला अपूर्व पदार्थ म्हणजे बाळंतिणीचा डिंकाचा लाडू! ..आम्ही ...

Rendez-vous

Run through the hall - Off with the office call! - If the door is away, take the nearest wall. Run down the stairs, Run down the street, Listen to the silent night and to your heavy feet. Rush to the station, run! Catch a train, Let some gloomy faces, places run through your brain. Run out of battery, Make way through the crowd, In the face of this city Shout my name loud!

La première balade

<< Comme la lune est pleine, tu la vois, toi?>> il dit. <<Ooh! Fais attention mon ami,>>  il hèle le moto qui nous frôle. Je plonge ma tête dans le dos fort Rêves venté, j'en veux encore.

वाचनात आलेले एक पुुस्तक!

Image
शीर्षक : मी आहे शहाण्णव कुळी मराठा पण मला नाही; गर्व त्याचा   लेखक:   श्री. मोहनराव बापूसाहेब माने प्रकाशक : हर्षराज प्रकाशन, मु. पो. कुडाळ, ता. जावली., जि. सातारा मुद्रक : सागर प्रिंटर्स, ५६१, गुरूवार पेठ, सातारा. स्वागत मूल्य : ११० रुपये  प्रथमावृत्ती : १५ ऑगस्ट २०११

Love is when..

When we say 'I hate _ _ _,' we mean 'I do not understand it'. When we say 'I love _ _ _ ', we mean 'I may or may not understand it, but that's OK.' Love is possible the moment we stop making a problem out of things - which doesn't mean we justify them. It also doesn't mean we fight them and be hostile. Love is neither 'for' nor 'against'. Love is when we do not approach things with divisive intellect.