Posts

Showing posts from 2021

'सोनवारा' (Sonwārā) now available in both Marathi and English!

Image
I recently translated 'सोनवारा' (Sonawārā), a Marathi book into English. It is written by Mrs. Mrinalini Vanarase (ecologist, author, researcher and of the gentlest souls I have met). It's a curious, insightful account of her garden and the world around. Both the original and the translated version are available in PDF format for a free download on her website:  https://www.mvanarase.com/sonwara  The print edition is on the way. Check it out if you like!      

नज़्म ०१

मिलकर भी यूँ हो जाते हैं ना मिलकर भी जाँ-पर्वर क्यूँ उन के सितम हैं कैसे बताएँ ! नक़्श-ए-असर गहरा हो चाहे ख़ामोशी का आह में कितना किस के असर है कैसे बताएँ ! सोज़-ए-क़रीन-ए-आतश से वाक़िफ़ हो कर भी  देखे ना थे जल्वे ऐसे, कैसे बताएँ !  उन ही से बातें करते हैं जब करते हैं... उन्स-ज़दा क्यूँ हद करते हैं कैसे बताएँ ! जिस्म-ओ-रूह की अज़्मत का मसला है जारी क़िस्मत सब ने की है, या-रब! कैसे बताएँ !   - मुक्ता 'असरार'   © मुक्ता असनीकर शब्दार्थ : यूँ हो जाना = मरून जाणे जाँ-पर्वर = जिवाचं रक्षण करणारा नक़्श = चित्र, कोरलेली नक्षी, भरतकाम नक़्श गहरा होना = एखादी गोष्ट काळजात खोल रुतणे आह = उसासा, निश्वास   सोज़-ए-क़रीन-ए-आतश = विस्तवाच्या फार जवळ गेल्याने पोळणे जल्वा = नूर, तेज, झळाळी, प्रिय व्यक्तीची झलक उन्स-ज़दा = इश्काने घायाळ झालेला अज़्मत = श्रेष्ठत्व, थोरवी, महत्त्व क़िस्मत = विभाजन, तुकडे करणे दिलकश = चित्ताकर्षक, मनोहर  जिद्दत-आगीं = नवनव्या कल्पना, शैलींनी युक्त; सृजनशील  सौदाई = विक्षिप्त, खुळा, आपल्याच धु़ंदीत असलेला बेज़ारी = उदासीनता, नाराजी, रस नस...

रविन्द्रसंगीत भाषांतर - ०१

Image
 शेइ तो तोमार पॉथेर बॉन्धू मूळ बंगाली गीत: रविन्द्रनाथ ठाकूर   मूळ बाङ्ला रचना: সেই তো তোমার পথের বঁধু সেই তো। দূর কুসুমের গন্ধ এনে খোঁজায় মধু সেই তো ॥ সেই তো তোমার পথের বঁধু সেই তো। এই আলো তার এই তো আঁধার, এই আছে এই নেই তো ॥     बंगाली उच्चार (गायनानुसार): शेइ तो तोमार पॉथेर बाॉन्धू, शेइ तो | दूर कुशुमेर गॉन्धो एने खोंजाए मॉधू, शेइ तो || शेइ तो तोमार पॉथेर बाॉन्धू, शेइ तो | एइ आलो तार, एइ तो आंधार, एइ आछे नेइ तो.. नेइ तो.. नेइ तो? शेइ तो तोमार पॉथेर बाॉन्धू, शेइ तो, शेइ तो तोमार पॉथेर बाॉन्धू, शेइ तो ||     हिंदी भाषांतर: वही तो तुम्हारा हमसफ़र है, वही तो है | दूर दूर से फूलों की ख़ूशबू ला कर तुम्हे रस खोजने जो भेजता है... वही तो है || वही तो तुम्हारा हमसफ़र है, हाँ, वही है | ये रोशनी उसी से है, ये अँधेरा उसी से है - यही है न..है न...है न? वही तो तुम्हारा हमसफ़र है...हाँ, वही है ||   

Sleep

Wait for her and she won’t come. Of course. Song can’t ferry you to her. No prayer, no command, no remedy helps. Lay at her mercy, tumble down countless stairs, I roll along great halls of the night. Waiting for her I miss her. She is when I am where I don’t know any more.  

We share a birthday

Image
जो माझा जन्मदिवस तोच साहिरचा, आणि खानोलकरांचा.    मुंबईच्या गल्ल्यांमधून तिघे भटकतोय. झपझप चालतोय आडव्या ओळीत - शेजारून येणा-जाणाऱ्या गाड्यांना, माणसांना काहीशी अडचण करत. बडबड करण्याचं काम नेहेमीप्रमाणे माझ्याकडे. ...आडव्या ओळीतच कुठल्याशा टपरीच्या आडोशाला थांबलोय. पागोळ्यांचा पडदा नाकालगत. बोलतोय फक्त पाऊस.    ..अशक्य. अशक्यच. केवढं अंतर आहे त्यांच्या-माझ्यात! पंख पसरले तरी छाटता यायचं नाही.    त्या दोघांच्या काळी सरत गेलेल्या दिवस-रात्री-तास-महिन्यांचं...माझ्या काळी सरत चाललेल्या दिवस-रात्री-तास-महिन्यांचं अंतर...      वाटतं त्याहून खूप सरळ आहे पण. साचा सौदा है |     मी साहिरचा लहरीपणा, त्रागा खपवून घ्यायचा: ठरल्या वेळेनुसार घरी गेल्यावर त्यानं नशेत हाकलून लावणं, किंवा तो झोपी गेलेला असणं.. दिवाणखाना वासट धुक्यात नेणारी सिगरेटमागून सिगरेट...कधी अम्रिताने ठेवलेले अर्धेमुर्धे तुकडे. ‘तिची-माझी भेट घडव की’ अशी गळ घातली तर म्हणणार, “औरत नहीं है वो - औरत से कई ज़्यादा, पर मर्द सी ज़ाइद नहीं | ऐसा वजूद ...मिल पाएँगी आप?" एकदा म्हटल...

प्रगल्भता, चोर व गुरु

Image
 प्रगल्भतेची प्रचलित कल्पना, प्रचलित व्याख्या फारच बावळट आहे.  ‘प्रगल्भता’, ‘परिपक्वता’, ‘प्रौढत्व’ हे शब्द आपण समानार्थाने वापरतो. आपल्या मते परिपक्व, प्रौढ व्यक्ती भाबडी नसते. तिच्या अंगी निरागसता असते, पण चमचाभर - चवीपुरती. जीवनातील अनुभवांमुळे आलेली पक्वता या व्यक्तीच्या वर्तनात जाणवते. प्रौढ व्यक्ती चुणचुणीत असते, सहजासहजी स्वतःची फसवणूक होऊ देत नाही. ती सावध असते; सर्वचदृष्ट्या, खासकरून मानसिकदृष्ट्या स्वतःचं रक्षण करण्यास सज्ज असते, कारण जग चित्रविचित्र वृत्तींनी, अनपेक्षित घटनांनी भरलंय ना! कोण कधी आपला गैरफायदा घेईल, आपल्याला उल्लू बनवेल कुणास ठावूक! ...किती क्षुद्र, उथळ, हीणकस कल्पना!  वास्तविक प्रगल्भ व्यक्तीचे गुणधर्म आपल्याला भलतेच चक्रावून टाकतील. प्रथमतः ती ‘व्यक्ती’ नसतेच. प्रगल्भ व्यक्तीला अस्तित्व असतं, व्यक्तित्व नव्हे. तिचं असणं अगदी हलकं असतं. तिचा सहवास सूक्ष्म असतो, क्वचित ‘हे माणूस नक्की आहे ना इथे?’ असा प्रश्न पडावा इतका सूक्ष्म. प्रगल्भ व्यक्तीच्या व्यक्तित्वाला वजन नसतं. प्रगल्भ व्यक्ती अर्थातच लहान मुलासारखी असते - किती सुंदर विरोधाभास - सहज, न...

गज़ल - ०१

समय की नोक पर लमहा मुझे इन्स़ाफ़ देता है मगर सुनता नहीं जल्लाद और मैं सुन नहीं सकती इबादत से मुहब्बत यूँ ह़ज़फ़ की तर्जुमानोंने मुहब्बत भी नहीं बनती इबादत भी नहीं बनती निक़ाबों में सलामत आप जो ता-ज़ीस्त रखते हो सुना है वो नक़ावत शक्ल-ओ-सूरतपर नहीं मिलती - मुक्ता 'असरार'     © मुक्ता असनीकर शब्दार्थ :  नोक = टोक, अग्र इन्स़ाफ़ = न्याय, निवाडा  जल्लाद = गुन्हेगाराची मान उडवणारा / फाशी देणारा  ह़ज़फ़ = काढून टाकणे, वगळणे, दूर करणे तर्जुमान = मध्यस्थ, पंडित, तज्ञ, अर्थ समजावून सांगणारे निक़ाब = नक़ाब, बुरखा, तोंड झाकण्याचे वस्त्र ता-ज़ीस्त = आजन्म, आयुष्यभर  नक़ावत = शुद्धता, निर्मळता

प्रेमाची झुळूक

Image
 प्रेमाचं नातं अतिशय तरल, नाजुक असतं - क्षणोक्षणी बदलणारं, अनिश्चित, अतर्क्य. उद्या काय घडेल, पुढल्या क्षणी काय घडेल कोणी सांगावं! मनात भय दाटतं. मग अनिश्चिततेच्या भीतीपोटी, अज्ञाताच्या भीतीपोटी प्रेमीजन आपल्या नात्याचा घात करतात. विवाहबंधनात अडकतात. माणसं लग्न करतात. त्याद्वारे बदलांना लगाम घालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रेमाचे बंध दृढ करायचे असतात. ‘प्रेम’...मोठी अजब चीज आहे. ज्याक्षणी तुम्ही त्याला दृढ करता, स्थैर्य देता तत्क्षणी ते असत नाही, उरत नाही; लुप्त होऊन जातं. प्रेम म्हणजे वासंतिक झुळूक! ती येते; आपल्या मदानं, गंधानं सारा आसमंत दरवळून टाकते, नि आली तशी निघून जाते. येते तेव्हा वाटतं, ही चिरकाल अशीच वहात राहील. ही भावना इतकी प्रबळ असते, की तुम्हाला तीबद्दल कणाचाही संदेह वाटत नाही. तीव्र निःशंकतेच्या भरात हरतऱ्हेच्या आणाभाका घेऊन मोकळे! हा केवळ वसंतवारा आहे, याचं भान नसतं तुम्हाला, तुमच्या प्रेमिकाला. वाऱ्याची झुळूक यायची तेव्हा येणार, जायची तेव्हा जाणार. तिचं येणं-जाणं आपल्या हातात नसतं. तिला धरून ठेवता येत नाही. उघड्या तळव्याला तिचा मंद गारवा जाणवतो, सुखावतो; पण मूठ झ...

Tongue-twisting rant for the letter 'R'

PETER POTTER BOATER BRUTE FATHER RATHER GATHER GROUP SHOWER HOUR POWER BREAD NEWER SEWER FEWER DREAD TRICKY TRIPPY TREMENDOUS TROT RUMOUR RULER ROOSTER ROT CRANE BRAIN GRAIN REFRAIN TRUSTED CRUSTED BURSTED TRAIN MUSTARD CUSTARD REGISTERED BASTARD SHAKER QUAKER BAKER MASTERED FETTER LETTER WETTER SWEATER NURSE'S PURSE VERSES BETTER INSTAGRAM AMSTERDAM LORRY SORRY HORRIBLE PRAM ARMS ALARM CHARMING WARM WRIST PRIEST GREETING NORM HIGHER WIRE CHOIRS ADMIRE LIAR TYRES FIRE REQUIRE WINKER PINKER TINKERBELL JINGER FINGER LINGERS WELL PEARS WEAR HARE'S HAIR TEARS NEAR EARS FAIR  

I see

 What do you see in a man? - A little boy who says 'be my little girl..'   What do you see in a woman? - A little girl chewing her little curl.. A little pearl whirling her little whirl..
Image
मौलिंगपुत्त - एक प्रकांड तत्त्ववेत्ता, गौतम बुद्धाचा समकालीन. तात्त्विक वादचर्चांमधे भाग घेऊन त्यानं मोठमोठ्या पंडितांना नमवलं होतं. गौतम बुद्धाबद्दल पुष्कळ ऐकून असल्यामुळे त्याच्याशी वाद करण्याची मौलिंगपुत्ताला फार इच्छा होती. समविचारी तत्त्वज्ञांचा गट घेऊन मौलिंगपुत्त बुद्धभेटीस आला. नम्र अभिवादन करून म्हणाला: “तुमच्याशी खुली वादचर्चा करण्याची मला इच्छा आहे. मात्र वादाची एक अट आहे, ती अशी: जर तुम्ही हरलात, तर आपल्याभवती जमलेल्या साऱ्या शिष्यगणांसह आपण माझं शिष्यत्व पत्करावं. जर मी हरलो, तर मी व माझे सहकारी आपलं शिष्यत्व पत्करू.”   गौतम बुद्ध म्हणाला, “हो, अवश्य. का नाही! माझीसुद्धा एक अट आहे. लगोलग चर्चेला सुरुवात करू या नको. तू आणि तुझे सहचर दोन वर्षं या इथे मौनात बसा. दोन वर्षं पुरी झाली की वाद घालू - हवंतर मी आठवण करून देईन. चालेल?”  मौलिंगपुत्त व त्याच्या सहकाऱ्यांनी आपापसात मसलत करून ही अट मंजूर केली. आपला निर्णय ते बुद्धाला सांगत होते तोच खदखदा हसण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. शेजारच्या वृक्षाखाली बुद्धाचा एक शिष्य बसला होता. न्यारी असामी होती बरं ही. क्वचितच बोलायचा...

एक चिनी शेतकरी...

Image
कोण्या एके काळी चीन देशात एक शेतकरी होता. एके दिवशी त्याचा घोडा तबेल्यातून पळाला. ही बातमी ऐकून त्या संध्याकाळी गावकीतली मंडळी शेतकऱ्याच्या घरी जमली. "च्च च्च च्च... तुझा घोडा पळाला ना.. फार वाईट झालं." शेतकरी म्हणाला, "ह्म... कदाचित".   दुसरे दिवशी घोडा परत आला. त्यानं आपल्याबरोबर आपले सात रानटी भाईबंद आणले.  तिन्हीसांजेला गावकरी मंडळी नेहेमीप्रमाणे शेतकऱ्याच्या ओसरीवर जमली. "काय शिकंदर नशीब आहे! सात घोडे आयते घावले की तुला! झ्याक झालं." शेतकरी म्हणाला, "हो - कदाचित."   तिसरा दिवस उजाडताच शेतकऱ्याच्या मुलाने रानटी घोड्यांना माणसाळवण्याचं काम हाती घेतलं. पैकी एका घोड्यावर स्वार होऊन रपेट करू लागला. घोड्यानं मुलाला आपल्या पाठीवरून उडवून लावलं. मुलाचा पाय मोडला.  शिळोप्याच्या गप्पा करताना मंडळी हळहळली. "बाप रे! नसती पीडा झाली च्यामायला त्या घोड्यांपायी, काय हो?" "हो ना - कदाचित," शेतकरी म्हणाला.   दरम्यान त्या प्रदेशातील राजकीय परिस्थिती पालटत होती. पुढल्या दिवशी रंगरूट (recruitment) अधिकारी गावात दाखल झाले. सर्व धडधाडकट पुरुषां...

Why

Why is it the way it is? The way it is.. the way it is... The way it is, the way it is is why it is the way it is. Why is it so? Nobody knows. Let it unfold. Let it be told. Enough for now to say it is the way it is, the way it is is why it is the way it is.    Click here to listen to the musical rendition!
I play with It It plays with me When you can't tell the player from the plaything, it's love, it's reality

Writing

Writing is talking without having to speak. Talking to oneself and the world at once, without being called 'insane' for it - sometimes that too. Writing is also a kind of keeping silent - silence over so many things.  A modest job. Lifting and drawing curtains, that's all.

व्येरा पावलवाच्या कवितेवरून:

आठवण दोघांची येते:   तो नसतो तेव्हा वाटतं, आत्ताच दार लोटून गेला की. असेल शेजारच्या खोलीत.   पण ती दाराबाहेर पडली, शेजारच्याच खोलीत असली तरी धाकधूक होते - वाटतं, जगातून नाहीशी झाली की काय!

:)

Image
च्वांग त्झू  आणि हुइ शी हाओ नदीच्या काठाने चालले होते.    च्वांग त्झू  म्हणाला, "मासोळ्या बघ पाण्यात कशा खेळतायत, सूर मारतायत. यातच त्यांना आनंद आहे."   "तुम्ही स्वतः मासा नाहीआत, मग माशांना कशात आनंद आहे ते तुम्हाला कसं ठावूक?" - हुइ शी चा प्रश्न. "तू म्हणजे मी नाहीस, मग माशांना कशात आनंद आहे ते मला ठावूक नाही हे तुला कसं रे ठावूक?" - च्वांग त्झू. "बरोब्बर! मी म्हणजे तुम्ही नसल्यामुळे तुम्हाला ते ठावूक आहे अथवा नाही हे जर मला कळू शकत नसेल, तर तुम्ही म्हणजे ती मासोळी नसल्यामुळे मासोळीच्या भावना तुम्हाला कळू शकत नाहीत - मुद्दा सरळ आहे!" - हुइ शी. "आं, जरा थांब," च्वांग त्झू म्हणाला, "आपण तुझ्या मूळ प्रश्नाकडे परत फिरू. 'माशांना कशात आनंद आहे ते तुम्हाला कसं ठावूक,' असं तू विचारलंस. म्हणजे मासे आनंदात आहेत हे मला ठावूक आहे, इतकं तुला समजलं होतं - 'कसं काय?' हा खरा प्रश्न होता. नदीतल्या मासोळ्यांचा आनंद मी जाणतो, कारण त्याच नदीकाठाने चालत असता स्वतःला होणारा आनंद मी जाणतो.  माझ्या आनंदाद्वारे मी केवल आनंद जाणतो....

Let me.

Yes, you are loved You've been loved well. Perhaps you've been loved enough. Too much perhaps, too much You are loved but you haven't been loved madly, so... It's absolutely true  you know, it's absolutely true. The way it flew down - tudoo!, you know it meant to come for you. If thy heart didn't tell thee already,...   You've got a lot of things to do, I know Lot of things to gain Oh the things, the things you'll lose and things you'll maintain.. What a pleasure, what a pain it'd be to maintain you! So please..... Click here to listen to the musical rendition!
Flowers are dreams. Fragrance is memory.  A great poet is a charming old dress that still fits. A shy poet is dewdrop trembling under the first rays. A reader is but an invisible finger. Sound is matter waking up. Noise, too, is a wave.   The universe flaunts us, and we are invited.

उगाच आख्यान

  संसारी माझ्या येउनि का ऐसा  केला घात पुरा, का असा रे घननीळा..   भारी गंमत आहे. 'का? का आलास तू?' भक्त / भक्तीण विचारतेय.  देवाला, प्रेमाला, सत्याला वारंवार केला जाणारा प्रश्न: 'का?'  एकूणेक उत्तरं या प्रश्नाच्या मापाची असतात, या प्रश्नात मावतात असं वाटतं की काय आपल्याला? हा घात आहे, विनाश नाही. विध्वंस नाही. कुणा माथेफिरूनं केलेली तोडफोड नाही, इतकं समजतंय. घननीळानं केलेला घात - असं भक्तिणीला वाटतंय बरं का. 'घात झाला. हे काय घडू दिलं मी?! आता कसं होणार माझं, काय होणार? ...का केलंस तू हे??!' शंकित झालीय ती. मनात खळबळ उडालीय. इथे कृष्णाचा विचार करत नाही आपण. कसा घडत असेल, मोडत असेल तो क्षणोक्षणी? कसा प्रकटत असेल, लोपत असेल? कृष्ण-कृष्ण म्हणजे तरी कोण?  आणि घात झालाच असेल तर नेमका कशाचा? - संसाराचा? नात्यागोत्यांचा? दैनंदिन कामाधामाचा? की असत्याचा? काय ढळतंय नेमकं? - मानमर्यादाच ना, रूढ कल्पनाच ना?  पण का?? 'का' काही संपत नाही!   मीच का? माझ्याच संसारात का? माझ्याच आयुष्यात का? आत्ताच का? याच रूपात का? नक्की उद्देश काय आहे याचा? ... छे, मला नकोय ह...

ए कुत्रे...

Image
‘कुत्र्यावरून शिव्या घालायच्या नाहीत’; ‘कुत्र्याला नावाने हाक मारायची, ‘कुत्रा/कुत्री’ म्हणायचं नाही' - कुत्रं पाळणाऱ्यांचे आवडते नियम.  मी विचार करून शिव्या घालत नाही. कुत्र्यावरून शिवी देता-देता स्वतःला ब्रेक लावणं माझ्याने जमलं नाही बुवा. पण तू घरात आलीस, नि त्या शिवीत घुसलीस, तिचा प्रोटोटाइप झालीस! ‘ए कुत्र्या / ए कुत्रे’ म्हटलं, की तू आठवायचीस, हसू यायचं. तुझे डोळे. …आम्ही बागेत फिरायला आलो होतो फक्त. इतर कुत्र्या-मांजरांपासून अंग चोरून उभी होतीस गाडीच्या एका कोपऱ्यात. पंजे शरीराच्या मानाने छोटे होते. मागचा उजवा पाय दुखरा होता, अधून-मधून हळूच झटकत होतीस. अ‍ॅक्सिडेंट झाला होता तुझा लहानपणी. ...ते टपोरे डोळे : हात फिरून फिरून गुळगुळीत झालेल्या दाट सागवानी रंगाचे. ‘मला कळतं सगळं’, आणि ‘मला काsही फरक पडत नाही’ या दोन गोष्टी एका दमात म्हणणारे डोळे.  प्रत्येक प्राण्याची, पक्ष्याची, झाडाची एखादी लकब असते, किंवा प्राणी पाळल्यानंतर असलं काहीतरी माणसाच्या लक्षात येतं - तू डोळा मारायचीस!   ...खरंच कळायचं तुला सगळं. शेपटीच्या पांढऱ्या गोंड्याचे अगदी टोकाचे केस कापले मी एकदा, तू ...

That's all.

 All I know is to be myself, absolutely true to myself under all circumstances. All I learn is, to do as I do and to let others do as they do. I do not claim to have understood it, I learn.  I learn to be helped, to be shown by the world.   And I am grateful to everyone - friends, lovers, strangers, animals, books, trees…the stones and pavement blocks that brush against my shoes, the yellow of a rare street-light, the pens, the grand-old computer; even to my parents, despite much discord - I am grateful to Everyone who lets me be.

Prayer to humanity

....Wrong question, sweetheart.  Please, look. A 'why' is the murder of love. 'Why should I..' 'What would I..' 'How could you..' 'Why did you..' 'When did I..' Sigh. ...Wrong questions in love.

प्रेमाचा नाच, भक्तीचं गूढ

Image
ज्यांना आपण ‘गूढवादी’ (mystic) म्हणतो अशा व्यक्तींची चरित्रं पाहाल, तर त्यांत फारसं साम्य आढळणार नाही; पुरेपूर वैविध्य, वैचित्र्य मात्र आढळेल.  कोणी नजरेसमोरून गेल्याचा पत्ताच लागू नये इतके सर्वसामान्य दिसतात, कळकट-मळकट रहातात. तर कोणी इतके तेजःपुंज, की वाटेवरल्या आंधळ्याचाही आत्मा क्षणिक उजळून जावा!   अंतर्बाह्य शहाण्या व्यक्तींच्या जगण्या-वागण्याचा कोणताही ठराविक ढंग नसतो, निश्चित गुणधर्म नसतात. त्यांपैकी कुणीही इतरांचं अनुकरण करत नाही; आदर्शांचा कित्ता गिरवत नाही. ज्यांना ‘गूढवादी’ म्हटलं जातं अशी मंडळी ईश्वराचं रूप दोन प्रकारे कल्पतात: सूफीपंथीय ईश्वराला प्रेयसी मानतात. त्यांच्यालेखी ती स्त्री असते. जगात ही एकमेव स्त्री असते, व सारीच माणसं ‘ति’चे ‘तो’ असतात. भारतातील गूढवाद्यांत ईश्वर हा प्रियकर असतो. जगात हा एकमेव पुरुष असतो, व बाकी सारे ‘त्या’च्या ‘ती’ असतात.  ... मीरा बावरी नाचत-गात मथुरेस पहोचली - कृष्णाच्या भव्य, प्रासादतुल्य मंदिरापाशी. त्याकाळी या कृष्णमंदिरात स्त्रियांना प्रवेश नव्हता! …कृष्णाच्या मंदिरात स्त्रियांना बंदी?? किती हा मूर्खपणा! पण आपल्यापैकी बहुत...

शब्द

शब्द ही एक जिवंत गोष्ट आहे. एक शरीर - लांबी, रुंदी, घनता, गती असणारा एक पदार्थ.  अलगद बोट बुडवून पहा; तळव्यात खुळखुळून पहा; जिभेच्या टोकावर त्याला तोलून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कदाचित. आनाइस निन च्या ते लक्षात आलं जेव्हा तिनं आपली पुस्तकं स्वतः छापली - टाईपच्या खिळ्यांनी ओंजळ भरली, शाईने कोपरं माखून घेतली, शर्टांच्या पाठींना घाम फोडला... शब्दाचा साक्षात्कार झाला तिला!   कुठल्याही जिवंत गोष्टीप्रमाणे शब्दांशीही आपलं दुतर्फी नातं असतं, एकतर्फी नव्हे. शब्द उच्चारताना, समजावून घेताना, त्याची किंमत करताना नेहेमीच इतर शब्द, प्रतिमा, ध्वनि, अनुभव, अपेक्षा, आठवणी वगैरे जोडून पहातो आपण त्याच्याशी, तुलना करतो... कधी स्वतःला जोडतो शब्दाशी थेट, कसल्याही मध्यस्थीशिवाय?   शब्द आपलं वास्तव आहेत, आपण त्यांचं वास्तव आहोत. ते आपल्या छायेत जगतात, आपण त्यांच्या छायेत जगतो - मरतोदेखील. इतर कोणत्याही नात्याप्रमाणे या नात्यात आपलं खरंखुरं प्रतिबिंब उमटतं. अस्तित्वावर बंधनं आपण लादून घेतो, स्वतःभवती सीमा आपण रेखतो, नि म्हणतो शब्द सीमित आहेत, त्यांचा आवाका मर्यादित आहे, त्यांची धाव अपुरी!...

चितमपल्लींचा तक्ता

Image

हॅट्स

Image
  हॅट्स मूळ इंग्रजी कविता: फ्रॅंक स्टुअर्ट फ्लिंट (१८८५ - १९६०) 'अदरवर्ल्ड: केडन्सेस' (१९१८) या कवितासंग्रहातून       ती कडक, करकरीत फेल्ट हॅट तू रुबाबात डोक्यावर ठेवतोस तेव्हा होणारा पोकळ, गोलसर आवाज..   प्रतिध्वनी दुमदुमतोय त्याचा   दोन हजार मैलांवर पसरलेल्या खंदकांत, हज्जारो बंदुकांच्या कंठांतून.   सहस्र सहस्र माणसं ठार झालीत नि कितीक सहस्र जखमाळलीत, पांगुळलीत, बुडून मेलीत - त्या आवाजामुळे.    कोलमडलेली, छिन्नविच्छिन्न शहरं, खेडी बेचिराख, धुळीस मिळालेली, नागवलेली वनस्थानं, ओरबाडून निघालेल्या झाडंवेली, नदीनाल्यांची झालीत गटारं; पोलादाच्या अवशेषांनी बुजबुजलेली   रक्तमांसाने बरबटलेली सडत्या प्रेतांच्या वासाने कुबलेली   सीमांमधली, सीमांपल्याडची ध्वस्त जमीन; भुकेने तडफडणारे देशच्या देश, स्त्रिया व लहानग्यांची कत्तल, प्रतिभेचा चोळामोळा, विद्रूपित, मुरगळलेली मनं.... साऱ्यासाऱ्याचा झालाय उकिरडा, झालीये नासाडी, निव्वळ नासाडी धरित्रीच्या फळाबहराची, वैभवाची  - तुझ्या आवाजाची ताबेदारी करताना. वांझोट्या, अविवेकी, मत्त सैतानी आवाजांच्या ...