विचार मौलिक (original) असतच नाहीत, अनुभूती मौलिक असते
* हे भाषांतर माझं नाही.*
प्रश्न: एकीकडे आपण गीता, बायबल, कुराण आदी धर्मग्रंथांद्वारे प्रतिपादित धर्म मानत नाही. मग त्यांचे विचार का म्हणून चोरता?
रजनीश (ओशो): ...काही दिवसांपूर्वी जे. कृष्णमूर्तींच्या एका अनुयायाचं पत्रं आलं. माझ्या विचारांमध्ये कृष्णमूर्तींच्या विचारांची झलक दिसते असं त्याचं म्हणणं आहे. स्वाभाविक आहे. पण हेदेखील लक्षात घ्या, की कृष्णमूर्तींच्या बोलण्यात बुद्धाची झलक आहे, लाओ त्सूची झलक आहे, उपनिषदांची छाप आहे. त्यांच्या विचारांमध्ये झेन गुरुंची पुनरुक्ति आहे.
याचा अर्थ 'कृष्णमूर्तींनी उपनिषदांतून विचार चोरले' असा घ्यावा का? - नाही, तसं म्हणणं चुकीचं ठरेल. माझी तर अशी धारणा आहे, की विचार मौलिक असतच नाहीत. भाषा मौलिक असतच नाही. 'मौलिक' (original) या शब्दाचा अर्थ समजावून घ्या. 'मौलिक' म्हणजे मुळापासून, उगमापासून, स्रोतापासून आलेलं. शब्द मौलिक नाहीत, ते शतकानुशतकांच्या परंपरेतून आलेले आहेत. पण शब्दांचा वापर करावा लागतो, बोलावं तर भाषेतच लागतं! त्याला इलाज नाही. दुर्दैव असं, की भाषेची वस्त्र चढवू लागताच अनुभूती गायब होते, लुप्त होते. ज्याला खरोखर समजून घ्यायचं आहे त्यानं मौन ऐकावं, मौनानंच पहावं, व बघता बघता आपण मौन होऊन जावं.

...तर विचार मौलिक नसतात; ते विचार 'माझे', 'तुझे' वा 'त्याचे' असं म्हणणारा 'मी'देखील मौलिक नसतो. 'मी'पणाची भावनाच उधार असते. संस्कारणातून, अहंकारातून आलेली बाब असते. मात्र अनुभूती मौलिक असते. उपनिषदकार ऋषींनी जे सत्य जाणलं, कबीरानं जे जाणलं, झरतुष्ट्रानं जे जाणलं, कृष्णमूर्तींनी जे जाणलं ते तुम्ही, मी, अन्य कोणीही जाणलं तरी त्यात कुठला फरक पडणार नाही. हां, भाषा, वा अन्य माध्यमातून सत्याची जी अभिव्यक्ती होते, तिच्यात थोडाबहुत फरक असू शकेल. पण मूलभूत फरक शक्य नाही, कारण सत्य एकच आहे.
मला अनुभूती आली. केव्हा केव्हा त्या अनुभूतीचा इतरांना आलेल्या अनुभूतीशी मेळ बसतो एवढंच. महम्मदाला, मीरेला, बुद्धाला, महावीराला वगैरे आलेल्या अनुभूतीशी माझ्या अनुभूतीचा मेळ बसतो याला इतकं कसलं महत्त्व द्यायचं?

ना त्यांनी माझे विचार चोरले, ना मी त्यांचे विचार चोरले. समुद्र कोणीही चाखला तरी चवीला खारटच लागणार! मला तो खारट लागला नि त्यांनाही खारट लागला यात मी काय करू? केवळ 'मी त्यांच्या विचारांची चोरी करत नाही' हे दाखवण्यासाठी समुद्राच्या पाण्याला गोड म्हणू?
जिथे माझ्या व कृष्णाच्या, कबीराच्या, नानकाच्या, मुहम्मदाच्या, येशूच्या - कोणी का असेना - अनुभूतीचा मेळ बसत नाही तिथे मुद्दाम मेळ बसवण्याचा प्रयत्न मी कदापि करत नाही. सरळ सांगून टाकतो, की या इथे माझ्या व त्यांच्या अनुभूतीचा मेळ बसत नाही, अमुक तमुक गोष्टीशी मी सहमत नाही.
पण बुद्ध, महावीर, नानक, येशू वगैरेंच्या भक्तमंडळींची, धर्म व धर्मग्रंथांच्या अनुयायांची, अगदी नास्तिकांचीदेखील अशी इच्छा आहे की एकतर मी त्यांच्याशी शंभर टक्के सहमत व्हावं, अथवा शून्य टक्के! - हे शक्य नाही.
एकतर मी 'वेद म्हणजे निव्व्ळ कचरा आहे' असं म्हणावं, किंवा 'वेद म्हणजे शंभर टक्के, निखळ हिरे आहेत' असं म्हणावं ही वेदपंडितांची इच्छा आहे. मी तसं करू शकत नाही, तसं करणं सत्याबाबत अन्याय होईल. वेदांमध्ये नव्व्याण्णव टक्के कचरा असला तरी एक टक्का हिरे आहेत. परंतु कचऱ्यालादेखील बळजबरीने हिरे सिद्ध करण्याचा प्रयत्न मी करणार नाही.

जो कचरा आहे तो कचराच असतो - मग तो कशात का असेना! तो कचरा आहे हे स्पष्ट होणं कधीही चांगलं, कारण जे एक-दोन टक्के हिरे असतील ते कचऱ्यात हरवून जाता कामा नयेत. ते विलक्षण आहेत, वेचण्याजोगे आहेत. परंतु आपण कचऱ्याला आग लावू शकलो नाही, तर हिरे त्यात हरवलेलेच राहतील.
अन् हेच मी तुम्हाला सांगतो आहे. जिथवर तुमच्या अनुभूतीचा माझ्या अनुभूतीशी मेळ बसेल तिथवरच माझ्यासमवेत चला. ज्याक्षणी तुम्हाला असं आढळेल, की तुमची अनुभूती आता वेगळं वळण घेते आहे, तेव्हा मला सोडून द्या, स्वतःच्या अनुभूतीसोबत जा.
हो, काही काळ आपण सोबत चाललो, एकसुरात गाणी गायली. हे आपलं सद्भाग्य होतं, त्याबद्दल कृतज्ञ राहू या. पण ज्याक्षणी तुम्हाला असं आढळेल, की तुमचा छंद आता त्याच्या स्वतःच्या रूपात प्रकट होतो आहे, तेव्हा तुमच्या तालात, तुमच्या छंदात गा, त्याचा हात धरा. कारण तुमच्या अंतर्यामीचा छंदच तुम्हाला परमात्म्याशी जोडणार आहे.
Comments
Post a Comment