संभ्रम व खात्री
संभ्रम (confusion) ही एक मोठी संधी आहे. कधीच संभ्रमात न पडणारे लोक मोठ्याच समस्येत असतात - 'आपल्याला सारंकाही माहित आहे' असं ज्यांना वाटतं त्यांना खरं पाहता काहीच माहित नसतं. 'आपल्याला सारंकाही स्पष्ट आहे' असं ज्यांना वाटतंं, ते खरं म्हणजे संकटात असतात. त्यांची स्पष्टता उथळ असते. ते जिला 'स्पष्टता' म्हणतात तो निव्वळ मूर्खपणा असतो. मूर्ख माणसं फारच ठाम असतात. याचाच अर्थ संभ्रम निर्माण होण्यासाठी आवश्यक तेवढी बुद्धिमत्ता त्यांच्यापाशी नसते. होय, संभ्रमात पडण्यासाठीही बुद्धिमत्ता लागते. बुद्धिमान माणूसच घोर संभ्रमावस्था अनुभवू शकताे. इतर लोक पुढे-पुढे जात रहातात, हसतात-खिदळतात, पैसा जमवतात, सत्ता व प्रसिद्धीसाठी ओढाताण करत राहतात... केवढा आत्मविश्वास असतो ना त्यांच्या अंगी! ती आनंदीसुद्धा भासतात. तुम्ही संभ्रमात, गोंधळात पडलेले असाल, तर त्यांच्याकडे पाहून तुम्हाला नाही म्हटलं तरी थोडा मत्सर वाटतो: 'आयुष्याबद्दल या लोकांना किती स्पष्टता आहे! त्यांच्यापुढे दिशा आहे, उद्दिष्ट आहे, लक्ष्य कसं गाठायचं ते त्यांना ठावूक आहे, जमतंही आहे! जणू ते एकेक पायरी चढत वर चाल...