बिल गन - उद्गार
तत्त्वज्ञान हा तुरुंग असतो. तुमच्याबद्दलच्या अघळपघळ, तऱ्हेवाईक गोष्टींना त्यात थारा नसतो.
व्यक्तीच्या विचारप्रक्रियेची निष्पत्ती काय, हे ती प्रक्रियाच जाणे!
माणसाला शिकवण्याची भारी खाज असते. त्यामुळे शिकण्याची सहजप्रवृत्ति नष्ट होते.
दर्यावर्दी ताऱ्यांकडून शिकतो. तारे काहीही शिकवत नाहीत. सूर्य आपलं अंतःकरण खुलं करतो, व फुलापानांवर प्रकाशाचा वर्षाव करतो.
वाचणाऱ्याची नजर पुस्तकाच्या पानांना लाज आणते. संकेतांमुळे कल्पनेचा सत्यानाश होतो. आसक्तीपुढे गर्वही वरमून जातो. तुम्ही पृथ्वीवरील अवमानित आहात. जणू वाळवंटात पाण्यासारखे आहात.
जगाचे लाडके होणं म्हणजे यशाची प्रतीकं होणं. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही यशस्वी होता कामा नये, कारण जगणं अंतहीन आहे.
तुम्ही फुलाइतके अनामिक आहात. व्हीनसचा पुत्र आहात. निसर्गतः वासना हेच व्हीनसचं वात्सल्य असतं.
तुमच्या बेंबीभवती तिची जीभ फिरेल, पण त्यात वावगं वाटून घेऊ नका, कारण प्रेमाविना जगात आहेच काय?
तुम्ही प्रेमाच्या रक्षणार्थ कामी येणारा दारुगोळा आहात!
Comments
Post a Comment