Posts

Showing posts from April, 2026

मित्र उगाळत होता त्याचं प्रेम, मीही माझं उगाळू लागलो:

Image
घराच्या त्या टोकाला असलेल्या खोलीतून दिसतो मी मला  कितीकदा   दिवाणखान्यात येताना. तू इकडेतिकडे पहात उभी नुसतीच, बॅग खांद्यालाच. मी माझ्या सवयीच्या खुर्चीत बसतो. कंटाळ्याच्या लाटेनं लोटून दिल्यागत तूही  मटकन् बसतेस कुठेशी. कुणीच काही बोलत नाही. "What do you want?"  हवेला एक तडा जातो. पुन्हापुन्हा काळजावर नख्या फिरवून गेल्यानंतर आता कशाला आलीस बयेे? उरल्यासुरल्या चिंध्या राहू देत की मला श्वासाला! सांंग कुठला चेहरा पाहू तुझा? कोणता आवाज ऐकू माझा? घोट घेऊ प्रेमाचा, की त्वेषाचा? मौनानेच तुझा गळा आवळू, की स्वयंपाकघरात जाऊन मारियाला तुझ्या आवडीचं चायनीज बनवायला सांगू? युरोपात पाऊल टाकणार नव्हतीस ना तू? मला तर युरोपच दिसायचा सारखा. गाठला एकदाचा. चिमटीत धरून वात विझवावी तशा आठवणी विझवता येत्या तर...? - अंधारात मी माझ्या खोलीकडे परत फिरलो असतो, 'आज चांगलाच भास झाला आपल्याला!' या विचारात.   - मुक्ता 'असरार' © मुक्ता असनीकर  

Lover & Muse

* This poem was first published in the March 2026 issue of Doublespeak Magazine * You brought me words ever so often – you still do now and then. When I read yours, I wonder whence they come to you, how and when.   I wonder if you pick them lying flat  or nudge them out of a difficult chair.  Do they perch on your window? Do you leave them at the station? Do they get away with mussing your hair?     I picture you drawing them out of smoke    and settling them with a mere stub.    When I try to puff while writing   my thoughts go out and lose their nub!     Pausing, thinking, crossing, nodding –   until you're through, do you push food away?   Dazing, looming, peaking, falling,   do they prefer Nyx to the light of the day?       I was a lover and I found a muse –  the one aye invoked in lore, Her kiss with the mark of Love I did confuse as it left a sear on my core. Rapt with all that Absinthe...