Posts

Showing posts from August, 2026

प्रतिष्ठेसाठी काम करणारा माणूस कार्यक्षम असूच शकत नाही

Image
 ** हे भाषांतर माझे नाही, मी फक्त याचेे संपादन केेले आहे. **   जन्मल्यापासून मरेपर्यंत, अखेरच्या क्षणापर्यंत तुम्ही अहोरात्र लढत, धडपडत असता, भांडत-तंटत असता; अथक, अंतहीन परिश्रम करता. याहून निराळी जीवनरीत अस्तित्वात असणार यात शंकाच नाही, मात्र आपण माणसांनी ही धडपड, हा झगडा (struggle) अगदी मनोभावे आपलासा केला आहे. शाळकरी मुले झगडा स्वीकारतात, वयस्क पिढ्यांनी तो स्वीकारला आहे. आपण का म्हणून झडगतो? त्या धडपडीचे, खटाटोपाचे, आकांक्षांचे सार काय असते? अस्तित्वाच्या सर्व पातळ्यांवर, हरेक क्षेत्रात आपण सदैव इतके वखवखलेले का असतो? तथाकथित ‘आध्यात्मिक’ मंडळी, दाढीधारी साधू-संन्यासी, राजकीय नेते, सत्ताधारी, उद्योजक, व्यापारी, ज्ञानसंपादन करणारी माणसे - सर्वचजण महत्त्वाकांक्षेने पछाडलेले असतात ते का बरे?? ही झुंज, वणवण, धडपड, तडफड...कशासाठी?   असे बघा: प्रत्येक जीवाचे काही ना काही कार्य असते. माणूस म्हणून आपल्याला काही कार्ये पार पाडावी लागतात - कामधंदा करावा लागतो, शिकावे लागते, पुष्कळ गोष्टी कराव्या लागतात. परंतु मनुष्याला केवळ कार्यधारक (functionary) न राहता आणखी काहीतरी / कोणीतर...