मित्र उगाळत होता त्याचं प्रेम, मीही माझं उगाळू लागलो:
घराच्या त्या टोकाला असलेल्या खोलीतून
दिसतो मी मला
कितीकदा
दिवाणखान्यात येताना.
तू इकडेतिकडे पहात उभी नुसतीच,
बॅग खांद्यालाच.
मी माझ्या सवयीच्या खुर्चीत बसतो.
कंटाळ्याच्या लाटेनं लोटून दिल्यागत तूही
तू इकडेतिकडे पहात उभी नुसतीच,
बॅग खांद्यालाच.
मी माझ्या सवयीच्या खुर्चीत बसतो.
कंटाळ्याच्या लाटेनं लोटून दिल्यागत तूही
मटकन् बसतेस कुठेशी.
कुणीच काही बोलत नाही.
"What do you want?"
हवेला एक तडा जातो.
पुन्हापुन्हा काळजावर नख्या फिरवून गेल्यानंतर आता कशाला आलीस बयेे?
उरल्यासुरल्या चिंध्या राहू देत की मला श्वासाला!
सांंग कुठला चेहरा पाहू तुझा?
कोणता आवाज ऐकू माझा?
घोट घेऊ प्रेमाचा, की त्वेषाचा?
मौनानेच तुझा गळा आवळू,
की स्वयंपाकघरात जाऊन मारियाला तुझ्या आवडीचं चायनीज बनवायला सांगू?
युरोपात पाऊल टाकणार नव्हतीस ना तू?
मला तर युरोपच दिसायचा सारखा.
गाठला एकदाचा.
चिमटीत धरून वात विझवावी तशा आठवणी विझवता येत्या तर...?
- अंधारात मी
माझ्या खोलीकडे परत फिरलो असतो,
'आज चांगलाच भास झाला आपल्याला!' या विचारात.

- मुक्ता 'असरार'
© मुक्ता असनीकर
© मुक्ता असनीकर

Comments
Post a Comment