Posts

Showing posts from July, 2026

संगीत

Image
  *कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*   जगता जगता मनाचा पट किती नरमलाय! दिसामाजी दोन वेळा मेजावरून कपडा फिरावा तसा हजारो दिवस-रात्रींशी, देहाशी लाग-लागून तो थकलाय, विरलाय. आडपडदा राखणं आता शक्य नाही - गरजच उरली नाही. या खोलीत येणं, करकरत्या फळ्यांवर चालणं.. शिकणं किती सहज झालंय नै आज? शिकवण्यातदेखील आता अवघडलेपण नाही. हा आपला पहिला वर्ग, पहिला पाठ. ...कित्येक वर्षांपूर्वी, तरुणपणी जे शिकून गेलास ते शिकणं नव्हतं मुळी. 'संगीत' हे तुझ्याकरता कुणीतरी बनण्याचं साधन होतं, 'संगीताचा विद्यार्थी' बनून माझ्यापाशी आला होतास. त्यात तुला गती होतीच. शिकणं औपचारिक, मोहोर उमटवून घेण्यासाठी. ..वयात येताना तडकलेल्या आवाजाचं न्यून वाद्याच्या सहाय्यानं भरायचं होतं. पिढीजात चांभारकी, कळकट 'गावंढळ' आयुष्य दूर ढकलण्यासाठी सुरांचं बळ तुला हवं होतं. गांभिर्याचा आवेश होता. संगीताबद्दल गांभिर्य होतं, नाही असं नाही. माझे धुळीत थुंकल्यासारखे बाष्कळात बाष्कळ शब्ददेखील वेचून घेतले असतेस तू तेव्हा.  आणि मी? ..संगीतापासून एक दरवाजा...

कर्म हेच फळ

Image
जोवर कर्म हाच आनंद बनत नाही; कर्माच्या बाहेर कुठूनतरी, कसलंतरी सुख मिळणार आहे या भ्रमात जोवर तुम्ही रहाल, तोवर दुःखंच दुःखं तुमच्या वाट्याला येणार हे नक्की .   वास्तविक कर्मात, आत्म-अभिव्यक्तीत तुम्हाला तृप्ती का वाटू नये? समाधान का मिळू नये? 'मला जगण्याची संधी मिळाली अन् मी जगलो; परिणामांची, फळाची तमा न बाळगता जगलो' - असं असेल तर मनुष्याला कर्म करण्यात आनंद होईल. आनंदासाठी परिणामांची प्रतिक्षा करावी लागत नाही, 'पुढं काय होतं पाहू' असं म्हणावं लागत नाही. आत्ता , इथे मी जे केलं, त्यातच मी तृप्त झालो, संतुष्ट झालो. ...कर्म करावं अन् तेवढ्यापुरतं मरून जावं! खरंच, प्रत्यक्ष मरणघटका येण्याची वाट का पहावी माणसानं? एकेक कर्म करीत जावं, तिथंच पूर्णतृप्ती साधावी, परिणामांना म्हणजे सुखदुःखांना तिलांजली द्यावी, त्यांच्या स्मृती साठवत, उगाळत बसू नये. जे व्हायचं होतं ते झालं, जेवढं करता येण्यासारखं होतं तेवढं केलं. विषय संपला.   सुख झालं, दुःख झालं; हसू आलं किंवा रडू आलं म्हणून काय बिघडलं? काय हरकत आहे? पण तुम्ही ती गोष्ट तिथेच संपू देत नाही, विरून जाऊ देत नाही. मनात धरून ...

धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे

Image
समाजव्यवस्था आकारास येत गेल्या तसे एकामागून एक ढाचे निर्माण होत गेले - राजकीय ढाचे, आर्थिक ढाचे, शैक्षणिक ढाचे...अनेकानेक structures . यातून संस्कृती आकारास येत गेल्या. जीवनात आपण प्राप्तीची क्षेत्रं निर्माण केली व धर्मालाही प्राप्तीच्या क्षेत्रातच घालून मोकळे झालो.     ज्याप्रमाणे आम्ही घर बांधतो, दुकानं थाटतो त्याप्रमाणे ही सृष्टी बनवणारादेखील कोणीतरी असला पाहिजे असं आम्हीच ठरवून टाकलं व साक्षात् ईश्वराला जन्माला घातलं! या ईश्वराचे गुणदेखील आम्ही निश्चित केले: तो नेहेमी न्याय करेल, अन्याय करणार नाही; तो प्रेम करेल, क्षमा करेल, पुण्याला इनाम देईल, पापाला शिक्षा देईल, मृत्यूपश्चात आम्हाला स्वर्ग-नरक देईल वगैरे सगळं आम्ही ठरवून टाकलं. ‘ईश्वर’ नावाचं एक अधिकारस्थान, एक authority निर्माण केली. बिचारा ईश्वर, त्याला नकार देण्याची सोय नव्हती, कारण त्या बापाचे बाप आम्ही होतो! स्वतःवर तर आमचा विश्वास नाहीच. ‘आमचे परस्परसंबंध, आमची नीतिमत्ता सगळं आमचं आम्ही पाहून घेऊ’ असं म्हणण्याची हिम्मत आमच्यात नाही. आम्हाला प्रत्येक ठिकाणी डोक्यावर बसणारी अधिकारी मंडळी पाहिजेत. बनावट...

हेतूची शुद्धी

Image
सत्याचा शोध घ्यायचाय? मग आपल्या अंगी दोन गोष्टी हव्यात: एक हेतूची शुद्धी आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रामाण्यावाचून जगण्याची हिंमत. आपल्याला नेमकं काय हवं आहे ते मनुष्याला बहुतेकदा कळत नाही. अनेक दिशांनी मनुष्य धावपळ करतो, पण काय मिळालं म्हणजे आतून शांत वाटेल, समाधान वाटेल, तृप्ती येईल...कळतच नाही.    तुम्हाला मार्गदर्शक, गुरु हवाय तो तरी कशासाठी? ...आपल्यासाठी काय हितकर आहे हे सांगणारा हवाय का कुणी? आपल्या विचार, भावना, इच्छांना संमती देईल असा कुणी हवाय? आशीर्वाद देणारा कुणी हवाय? करमत नसेल, कंटाळा येईल तेव्हा ज्याच्यापाशी जाऊन बसता येईल असा कुणी मनुष्य हवाय का? जुन्या नातेसंबंधांना मन विटल्यामुळे नव्या प्रकारचा संबंध म्हणून गुरु हवा का? पण त्यानं सांगितलेलं आपल्याला पटलं नाही तर? आपल्या मनाला, 'अहं'ला रुचलं नाही तर? तर काय करायचं? त्याच्या शब्दांची, वचनांची मोडतोड करायची, विपर्यास करायचा? आपल्या सोयीप्रमाणं वाकवून मग ते ग्रहण करायचे? काय हवंय काय? मानसिक संरक्षण हवंय का? आपण जसे आहोत तसा आपल्याला स्वीकारणारा हवाय का कुणी? ही स्वतःची जी ओळख आहे, ती आधी साधली पाहिजे...

संभ्रम आणि खात्री

Image
 संभ्रम (confusion) ही एक संधी असते. कधीच संभ्रमात न पडणारे लोक मोठ्याच समस्येत असतात. 'आपल्याला सारंकाही माहित आहे' असं ज्यांना वाटतं, त्यांना वस्तुतः काहीच माहित नसतं. 'आपल्याला सारंकाही स्पष्ट आहे' असं ज्यांना वाटतंं, ते संकटात असतात. त्यांची स्पष्टता उथळ असते. ते जिला 'स्पष्टता' म्हणतात तो निव्वळ मूर्खपणा असतो. मूर्ख माणसं फारच ठाम असतात. याचाच अर्थ संभ्रम निर्माण होण्यासाठी आवश्यक तेवढी बुद्धिमत्ता त्यांच्यापाशी नसते.   होय, संभ्रमात पडण्यासाठी बुद्धिमत्ता लागते. बुद्धिमान माणूसच घोर संभ्रमावस्था अनुभवू शकताे. इतर लोक पुढे-पुढे जात रहातात, हसतात-खिदळतात, पैसा जमवतात, सत्ता व प्रसिद्धीसाठी ओढाताण करत राहतात... केवढा आत्मविश्वास असतो ना त्यांच्या अंगी! ती आनंदीसुद्धा भासतात.  तुम्ही संभ्रमात, गोंधळात पडलेले असाल, तर त्यांच्याकडे पाहून नाही म्हटलं तरी थोडा मत्सर वाटतो तुम्हाला : 'आयुष्याबद्दल या लोकांना किती स्पष्टता आहे! त्यांच्यापुढे दिशा आहे, उद्दिष्ट आहे, लक्ष्य कसं गाठायचं ते त्यांना ठावूक आहे, जमतंही आहे! जणू ते एकेक पायरी चढत वर चालले आ...

शब्द (with original English poem)

Image
  शब्द   कमला दास ( Kamala Das / Kamala Surayya / Madhavikutty) मराठी भाषांतर: मुक्ता 'असरार'   शब्द, शब्द, शब्द - शब्दच शब्द माझ्याभवती ! पानांसारखे फुटत राहतात मला ते. त्यांचं हे आतपासून सावकाश पालवणं कधी थांबेलसं वाटत नाही तरी मी बजावत रहाते स्वतःला, 'जरा जपून! नसती ब्याद आहे ही. अगं, कस-कसली रूपं धारण करतात ते! - सुसाट पायांनी कचकन् थांबून बघावी अशी रस्ता चिरत गेलेली भेग काय, सुन्न करून टाकणाऱ्या लाटांचा समुद्र काय, पेटलेल्या वाऱ्याचा झोत काय, जिवश्च मित्राचा गळा कापायला शिवशिवणारा सुरा काय!!'  शब्द…..वैताग मेला.  फुटतात ते मला, जशी पालवी फुटावी झाडाला. कुठल्याशा गाढ आंतरिक शांतीतून त्यांचं हे उगवत रहाणं कधी थांबेलसं वाटत नाही.     WORDS Kamala Das All round me are words, and words and words, They grow on me like leaves, they never Seem to stop their slow growing From within... But I tell my self, words Are a nuisance, beware of them, they Can be so many things, a Chasm where running feet must pause, to Look, a sea with paralyzing waves, ...

To humanity

 ....Wrong question, sweetheart. Please, look: a why is the murder of love. 'Why should I..' 'What would I..' 'How could you..' 'Why did you..' 'When did I..' Sigh. ...Wrong questions in love.     - Mukta ‘ Asraar © Mukta Asnikar

दीक्षा

Image
  * हे भाषांतर माझं नव्हे, मी केवळ याचं संपादन केलंय.*   ...आपला भूतकाळ सोडून देण्याची तयारी म्हणजे दीक्षा. माझं अस्तित्व म्हणजे माझा भूतकाळ नव्हे, भविष्यकाळदेखील नव्हे, अस्तित्व म्हणजे केवळ वर्तमान हे पूर्णतः उमजून घेण्याची तयारी म्हणजे दीक्षा.    यजुर्वेदातील एका सूत्राची सुरुवात 'व्रतेनं दीक्षां आप्नोति...' अशी होते. म्हणजे व्रतातून म्हणे दीक्षा येते. छे! व्रताचा दीक्षेशी कसलाही संबध नाही. व्रत म्हणजे खरंतर आत्म-अनुशासित जीवन. व्रतातून दीक्षा कशी येईल? दीक्षेविना व्रत येईल कसं?  व्रत म्हणजे शपथा वगैरे नव्हेत. उदा. जो माणूस खरं बोलण्याचं व्रत घेतो, तो आपल्या अंगी खोटं बोलण्याची प्रबळ ऊर्मी असल्याचीच घोषणा करत असतो. अंतरंगी असलेल्या खोट्याच्या आकर्षणानं तो घाबरून गेलेला असतो. खोटं बोलण्याची प्रवृत्ती दाबून टाकण्याचे आडदांड प्रयत्न करून पाहतो - ते असफल ठरतात. मग तो गर्दीसमोर, धर्मोपदेशकांसमोर, जाहीररित्या शपथ घेतो, व्रत घेतो: 'मी खरं बोलेन.' लोकांसमोर व्रत घेतलं आहे, तेव्हा व्रताचा भंग करणं म्हणजे समाजाला आपल्याप्रती असलेला आदर गमावून बसणं.  अस...

Why

Why is it the way it is? The way it is.. the way it is... - The way it is, the way it is is why it is the way it is. Why is it so? - Nobody knows Let it unfold, Let it be told. Enough for now to say it is the way it is,  The way it is  is why it is the way it is.    - Mukta ‘ Asraar © Mukta Asnikar     Musical version: Why