मीचका
रस्ता आणि फुटपाथ यांदरम्यान एक अरुंद, निकामी जागा असते सिमेंट मारलेली, क्वचित गवतापानांतून गेलेली. त्या जागेतून चालायला मला आवडतं.
आइस्क्रीम आवडतं, थंडी-पावसात काहीवेळेस मुद्दाम खावंसं वाटतं.
मनात येईल तिथे थुंकायला आवडलं असतं पण...
हसणं आणि रडणं खूप आवडतं - खूप! हसता हसता पोटात कळ उठल्यावर लोळायला मिळालं तर मस्तच. अश्रू पुसणं आवडत नाही, अन् रडून होताच गालांवर जमणारा खारटपणाही आवडत नाही.
आसपास घोंगावणारे चेहरे, आवाज, लकबींचे पुंजके - ज्यांना आपण 'लोक' म्हणतो - बघत रहायला आवडतं. त्यांचं चालणं, बोलणं, खाणं, डोळ्यांतलं पाणी पुसत झपाझप निघून जाणं, त्यांचे पोषाख, सबत असलेली लहान मुलं... माणसांकडे पाहत राहिल्याने स्वतः माणसात असल्यासारखं वाटतं. कधी आवाज शून्यावर आणून केवळ हालचाली निरखाव्या... कधी वाटतं ह्या साऱ्यांना बॉक्समधे भरून ठेवावं आणि एकटीनंच हिंडावं शहरभर. जाऊ तिथं फक्त आपण. माणसांखेरीज सगळं जिथल्या तिथे.
शब्दांवर जितकं प्रेम करते तितकीच डाफरते. त्यांच्या मोहात पुरती चूर होते व त्यांचा संसार मोडून पळून जाण्याची (खोटीनाटी) तयारीदेखील करते.
कपडे घालण्याची कल्पनाच मुळी मला रुचत नाही. ...नुसत्या कटाक्षाने कपड्यांची राख झाली असती तर!

पोहायला शिकण्याचा धीर होत नाही. पाणी जिवाला वरचढ होऊ लागलं, नाकातोंडात शिरु लागलं की भय वाटतं. राक्षसी लाटांची स्वप्नं पडतात. मग जाणवतं, नवी भाषा शिकताना काहींना अशाचप्रकारचं भय वाटत असणार. अनोळखी उच्चारांच्या, संदर्भांच्या, नियम व अपवादांच्या लाटा पाहून त्यांचं ऊर धपापतं... आपण एकमेकांना थोडं आणखी जपावं, थोपटावं, कुरवाळावं असं मला वाटतं.
पण कोण लागते मी इतरांची? कोणत्या अधिकाराने माया करावी? - हा प्रश्न उद्भवल्यावर सारंच संपतं, नाही का, सुरू होण्यापूर्वीच? हा प्रश्न अवघ्या अस्तित्वालाच गिळून टाकतो. बहुतेकदा आपण या प्रश्नाच्या कुबट, अंधाऱ्या पोटात जगत असतो.
तंदुरुस्त पुरुषाचे गुडघे, मांडीचे स्नायू पाहण्याची हौस. घोड्यांची धाव आठवते. आणखी एक अप्रतिम पुरुषी गोष्ट म्हणजे पुरुषी हुंकार - गाणाऱ्या, खासकरून जुनी चर्चगीतं, लोकगीतं गाणाऱ्या पुरुषाच्या आवाजातील खर्ज. जणू पाताळातून येणारा स्वर.
साबण, पर्फ्यूम, घामाचा वास साफ उडाल्यावर पुरुषाच्या छातीला गवताच्या पिवळट तुसांचा धीमा, उग्र वास येतो... कुठल्याशा सुनसान माळावर खरबरीत जमिनीत तोंड खुपसून मी पहुडलेय. डोळे उघडताच दूरदूरवर निळं आभाळ, सळसळ पाती.
स्त्रीच्या कुशीला वास असतो कच्च्या कळ्यांचा, रात्रींचा; त्यांच्या मुठीत काय दडलंय हे ठावूक नसूनदेखील माणूस ज्यांचा पाठलाग करतो अशा गूढ स्वप्नांचा. तिच्या मांड्यांवर ओठ म्हणजे तर संधिप्रकाश मिसळलेल्या दारुचा घोट!
कुत्र्याच्या स्वच्छ कानांचा वास, मांजरपिलाच्या पोटाचा, पानांच्या मागल्या अंगाचा, सात्त्विक अन्नाचा वास, पहाटवेळी बेकरीच्या भटारखान्यातून येणारे वास, नव्या शाईचा, कडकडीत उन्हात वाळलेल्या कपड्यांचा वास, बेलफळाचा गुंगवणारा वास, दळल्या जाणाऱ्या मसाल्याचा, गरम-ताज्या साजुक तुपाचा, चहाच्या उकळीचा, उत्तम संगीताचा, उत्तम जुन्या फर्निचरचा, झोपलेल्या झाडांचा आणि देवळांचा.. वासांवर, गंधांवर माझं प्रेम आहे. कुशीत शिरणारं, कुशीत घेणारं प्रेम.
अंथरुणात एकमेकांच्या कुशीत झोपणं - तसं पाहिल्यास गुंतागुंतीचं प्रकरण. चुकून हात, पाय अंगाखाली राहून जातो, नंतर दुखत राहतो. दाढी आवडते पण टोचते. मोठ्या केसांच्या बटा तोंडात जातात. श्वासांचे आवाज अधिक जोराने ऐकू येतात. तरी दोन नग्न, मर्त्य शरीरांनी, सृष्टीतील दोन अतिसामान्य कणांनी एकमेकांचा आसरा होणं, एकमेकांची लपण्याची जागा, एकमेकांचा अवकाश होणं या कल्पनेनंच मी आत्यंतिक समाधान पावते.
कधी वाटतं आपण पुरुष असतो तर..!; कधी वाटतं आहोत त्याहून जरा जास्त बायकी असतो तर....!

मग लक्षात येतं की हवं तेव्हा हवं ते होण्याची मोकळीक हवी असते मला बस्स. मला जादुई व्हायचं असतं. मात्र आपण घडवून आणली नाही तरी जादू घडतेच की. मोकळेच असतो आपण.
Comments
Post a Comment