खरं-खोटं
मोजक्याच गोष्टी खऱ्या आहेत - आजचा हा क्षण, या क्षणी मी करत असलेली गोष्ट, आणि शुद्ध प्रेमाखातर ती करताना मला जाणवणारा साऱ्या जगाशी असलेला संबंध; घट्ट, अतूट नातं संपूर्ण अस्तित्वाशी.
या सत्याच्या व आपल्यामधे जे जे आहे, आपण जे जे भरलंय, कोंबलंय - महत्त्वाकांक्षा, अपेक्षा, त्या पूर्ण करण्याची घाई, त्या घाईतून होणारी हिंसा, मोडतोड, मानसन्मान, प्रसिद्धी... सतत मानगुटीवर बसलेलं असमाधान, 'कुठेतरी पोहचायचं आहे' हा भ्रम, सुरक्षिततेचा भ्रम, ती मिळवताना वाया जाणारी ऊर्जा - सारं खोटं आहे.
यावर आपण जे वाद घालतो, जे युक्तिवाद करतो, तेदेखील खोटे.
केवळ ते दिशाहीन, उद्देश्यहीन, निरुपयोगी पण जिवंत प्रेम, बदलतं, लवलवतं प्रेम; जे आपल्याला जगापासून तोडत नाही, तर जगाशी जोडलेलं असू देतं, जे आपल्याला मुक्त, पवित्र राखतं - कोणत्याही गोष्टीबाबतचं प्रेम, त्या गोष्टीच्याही पलीकडे नेणारं - हेच तेवढं खरं. ही वस्तू फार मोलाची. ही म्हणजेच आपण. आपलं तरी काय काम आहे या जगात? खरं पाहता काय उपयोग आहे? माणसं एकमेकाला ''तू उपयुक्त आहेस'', ''आयुष्याला काही एक अर्थ आहे'' हे पटवून देण्यात केवढी ऊर्जा वाया घालवतात! किती धडपडतो आपण! आयुष्याला काय अर्थ असणार! आणि नसणार तरी कसा बरं? ते फक्त आहे. फक्त आहे.

कस्तांतिन पउस्तोव्स्की या लेखकाची 'रानगुलाब' ही गोष्ट मराठीतून वाचतेय मी.
वनअधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी 'माशा' नावाची तरुणी बोटीवरून कामाच्या गावी निघालेली असते. रात्री धुक्यामुळे बोट किनाऱ्याला लावली जाते. पाय मोकळे करावे म्हणून माशा खाली उतरते. तेथील माळावरून, दंवाने चिंब भिजलेल्या गवतातून, गुलाबाच्या उंच रशियन झुडुपांतून चालत राहते. बोटीचा भोंगा वाजतो. ती माघारी फिरते. आसपासच्या सर्व गोष्टींबद्दल तिला आपलेपणा वाटू लागतो. 'मला खरं म्हणजे हेही मााहित नाही की आपण कोणत्या भागात, कुठल्या गावात आहोत पण असं वाटतंय जणू कधीकाळी मी इथेच जगलेय, इथे लहानाची मोठी झालेय आणि आता पहिल्यांदाच या साऱ्याचा निरोप घेण्याची वेळ आली आहे!'
Comments
Post a Comment