तीतेतूमी

जमीन झोपलीय.
बी जागं आहे.
चुळबुळतंय
टाहो करतंय
त्याचा आवाज पुरत नै
तिचा पदर हलत नै
बिच्चारं बी, त्याला
काsही कळत नै.

तू झोपलायस
की मी जागी आहे?

Comments