...अ‍ॅट होम

 * ईमेल खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुनःप्रकाशित करतेय *

मारिएला इएना (Mariella Ienna) हिनं लिहिलेलं 'फ्लॉवर्स अ‍ॅट होम' (Flowers at home) हे सुंदर पुस्तक हाती लागलं होतं काही वर्षांपूर्वी.
 
बाई व्यवसायाने वकील होती, पण जीवनाच्या कुठल्याशा टप्प्यावर अवचित फुला-पाना-पाचोळ्यांकडे वळली व तिथेच थबकली, रमली. आज ती गृहसजावटीशी संबंधित आणखीही बरंच काही करते.
मारिएला स्वतःला 'पौष्प-अराजकतावादी' (Floral anarchist) म्हणवते. फुला-पाना-काटक्या-फांद्यांचं प्रत्येक अवस्थेतील सौदर्य अनुभवणं, वेचणं, घडी दोन-घडीभर त्याचा केलेला सहज पाहुणचार व तितक्याच निखळ आनंदानं त्याला दिलेला निरोप म्हणजे केवळ 'सजावट' नव्हेच - ही तर सर्जनशील, मनस्वी अराजकता! आपण स्वतः खेळून बघत नाही तोवर ती असंभव, अनिष्ट, आदर्शवादी वाटणारच.
 
माझे खेळ सुरु झालेत, आणि खूपच मजा येतेय कारण मी झाडावरून काहीही तोडून घेत नाही. चौदा ओळींच्या चौकटीतून असंख्य गंमती काढून दाखवणारा सॉनेटिअर झाल्यासारखं वाटतंय!


Comments