स्वप्न
मी, जॉर्ज ऑर्वेल आणि टी. एस. एलियट एका मोठ्या खाटेवर एकमेकांशेजारी पहुडलो होतो. जाड पांघरुणातही थंडी वाजत होती. ही खाट नेमकी कुठे असावी? वर खुलं आकाश होतं, भवती अंधार.
आम्ही वाळवंटात आहोत असं वाटत होतं. इतरांना विचारण्याची, वा स्वतः उठून खात्री करून घेण्याची इच्छाच होत नव्हती.
माझ्या पाठीमागं ऑर्वेल आणि एलियट एकमेकांकडे तोंड करून बोलत होते. मी शेजारच्या खाटेवर शाल लपेटून, पाय छतीशी मुडपून बसलेल्या आमच्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांशी गप्पा मारत होते.
मागून येणारा आवाज बंद झाला. दोघे झोपी गेले असावेत. बऱ्याच वेळाने ऑर्वेल म्हणाले, "जरा इकडे बघ."
मी मागं वळून पाहिलं. ऑर्वेल एलियटकडे एकटक पाहत होते. त्यांनी माझा हात हातात घेऊन एलियटच्या मनगटाला लावला - नाडी बंद पडली होती.
मग मी व ऑर्वेल शांतपणे झोपी गेलो. डोळे मिटण्यापूर्वी मी शेजारच्या खाटेवर नजर टाकली - गुढघ्यांवर हनुवटी टेकवून आमचे प्राध्यापक विचारांत पार गढले होते.

Comments
Post a Comment