शब्द मोठे की सूर?

 
वोल्फगाङ्ग आमाडेउस मोत्सार्टची (Mozart) प्रतिभा आपल्याला मोहून टाकते, भारून टाकते. त्यानं ज्यांसोबत  काम केलं ते लिब्रेटिस्ट्स (ओपेरालेखक - संहिता, गद्य/पद्य लिहिणारे) देखील आपल्या कामात तोडीस तोड होते बरं. कुठेसा वाचलेला हा प्रसंग अगदी ठळकपणे लक्षात राहिलाय. विस्मरण्यापूर्वी सांगते:
 
'सूर सर्वश्रेष्ठ, सुरांचं महात्म्य निर्विवाद आहे' असं मोत्सार्टचं पालुपद चालू असायचं. एका लिब्रेटिस्टनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, "अरे, सूर आणि शब्द परस्परपूरक नसतात का? दोहोंपैकी एक जरी नसेल तर ओपेरा उभाच राहणार नाही." 
 
पण मोत्सार्टचं आपलं तेच.
 
तेव्हा लिब्रेटिस्ट म्हणाला, "ठीक आहे. यापुढे रद्दी कागद, वाणसामानाच्या याद्या वगैरेंतल्या शब्दांना संगीत दे, तेच गाऊन घे रंगमंचावर. फक्त सूरच श्रेष्ठ असतील, तर त्यांच्या मखरात वाट्टेल ते शब्द बसवा, खपतीलच की. शिवाय माझ्यासारख्या लेखकबिखकांच्या मानधनावर खर्च होणारे पैसे वाचतील." तेव्हा कुठे मोत्सार्टच्या डोक्यात प्रकाश पडला!

Comments

Post a Comment