कबूल कर! (जर्मन नाटुकलं)

* * हे भाषांतर माझे नाही * *
 
कबूल कर!
मूळ जर्मन नाटुकले
 
 कबूल कर, तुला इथे स्वातंत्र्य आहे.
- कबूल.
 
कबूल कर, तुला आम्ही प्रेमाने वागवतो. तूसुद्धा आमच्यावर प्रेम करतोस.
- कबूल.
 
सारंकाही अगदी तुला हवं तसं आहे, कबूल कर.
- कबूल करतो.
 
एखादी गोष्ट तुला कबूल नसेल, तर तसं सांग. 
- ...माहित नाही.
 
कबूल कर, की हा विजय तुझाच आहे.
- कबूल.
 
कबूल कर, की आपण एकमेकांना भावासमान आहोत.
- कबूल करतो. 
 
तु सुखी आहेस, हे कबूल आहे ना तुला? 
- माहित नाही. 
कबूल कर!
- आहे कबूल.
 
मोकळेपणाने बोलून आता तुला हलकं वाटतंय ना?
- हो.
कबूल कर!
- कबूल करतो.
 
हं. शेवटी काय म्हणायचं असतं..?
- धन्यवाद.

Comments