उद्या नक्की (जर्मन नाटुकलं)

 
* * हे भाषांतर माझे नाही * *
 
उद्या नक्की
मूळ जर्मन लेखक: फ्रीडरिष कार्ल वेश्टर  
 
 (एक माणूस घराचं दार उघडून आत येतो, आणि सुरा बाहेर काढतो.)  
तो: आज सोडत नाही मी तिला.
(आतल्या खोलीतून बाईचा आवाज) ती: आलं का माझं नवरुडं! ये, सरळ आत ये.
तो (सुरा पायपुसण्यावर घासत): आज संपवतोच कसा तिला. थंडगार करून सोडतो.
ती (आतूनच, जरा मोठ्यानं): पायपुसणं पुन्हा फाटलं ना तर माझ्यइतकी वाईट कोणी नसेल, सांगून ठेवते!

Comments