ज्युलिआं
* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
ज्युलिआं
मुक्ता 'असरार'
ती
जागी झाली तेव्हा दुपार कलली होती. उन्हाचा उभा आयत खिडकीतून आत आला होता.
छतापासून डागडुजीला आरंभ केल्याप्रमाणं जुनाट वॉलपेपर उजळवत हा पट्टा
पलंगात उतरला होता. उन्हात माखलेल्या पावलाकडे, नखांच्या अस्फुट तकतकीकडे
पहात ती जागीच पडून राहिली.
कॅबरेत
गाऊ लागल्यापासून सकाळ होताना पाहणं दुरापास्त होतं, त्यावेळी ती गाढ
झोपेत असे. मोठ्ठ्या पंपांतून रस्त्यांवर पाणी मारणारे स्वच्छता कर्मचारी,
दुचाकी उडवत जाणारे पेपरवाले, गल्लीच्या तोंडाशी एखादा 'शुमान' लाँड्री
ट्रक थांबल्यानं ट्रॅफिकला बसणारं बूच, त्यावरून होणारी बाचाबाची, चामडी
दप्तरं एकमेकांवर उगारत धावणारी शाळकरी पोरं, हिवाळ्यात स्वच्छ ऊन पडल्यास
'काफे कोसार'बाहेर पत्ते कुटत बसणारे म्हातारे... तिच्या जाणिवेत या
दृष्यांना अस्तित्व उरलं नव्हतं - तसं पाहता त्यामुळं काही बिघडत नव्हतं.
सकाळ रोजच उगवत होती, दुपारही होत होती. दुपारभर आन्हिकं, घरगुती कामं,
खरेदीबिरेदी उरकून संध्याकाळी ती कॅबरेत पहोचत असे.
ही चाकोरी मोडल्याचे प्रसंग कमीच... वसंतातील एके सकाळी त्यानं झोपेत असलेल्या तिला खांद्यावर टाकलं, आपल्या उघड्या मोटारीत ठेवलं. तिच्या जड पापण्या किलकिल्या झाल्या तेव्हा गाडी बुआ दं बूलोन्यंच्या रम्य, प्रसन्न वनवाटांवर होती. हॉर्नबीम, सेडर, बीच, एल्म आदींच्या गर्द हिरवाईनं निळ्या आभाळावर काढलेला कशिदा, पक्ष्यांची किलबिल, असंख्य फुलामंजिऱ्यांचा संमिश्र दरवळ.. जणू मायावी लहरीवर तरंगत ती स्वर्गात पहोचली होती; हिरवळीवर बागडणारी, तळ्यांत विहरणारी मुलं-माणसं जणू बूट-कोटातील देवदूत होते.
वसंतातली ती सकाळ.. अन् ही दुपार.
बाहेर रिमझिम सुरू झाली. वासंतिक पावसाच्या लपंडावानं लोक वैतागतात. वैतागून काय होणार! त्यापेक्षा उनाड सरींशी आपणही उनाडपणा करावा. जरा उघडीप झाली, की छत्री-रेनकोट न उघडताच ती बाहेर पडे, अन् या बेफिकिरीला दाद म्हणून की काय, अनेकदा पाऊसही थांबून राही.
बाहेर अंधारलं होतं. तिनं जुनं लाकडी कपाट उघडलं. शिफॉन, रेशीम, ब्रोकेड, फ्रिल्स, चमक्या, खडे, पट्टे.. नजरेत सारं गोळा होऊन वितळू लागेपर्यंत कप्प्यात लटकणाऱ्या इव्हनिंग गाउन्स, बॉडीकॉन्समधे ती हरवून गेली होती.
आज कामावर जायचं नाही हे लक्षात येईपर्यंत केस विंचरून झालेदेखील.

काल दुपारी घातलेल्या कपड्यांतच ती दाराकडे निघाली. हवेत किंचित गारवा होता. काळ्या तोप-कोटात शिरता शिरता घराच्या खिडक्या बंद केल्या. तळहातांनी दाब देत ती दरवाजापासच्या आँफिलाद टेबलावर चढून बसली, व पोटऱ्यांपर्यंत येणारे बूट घातले.
मंद उजेडात जिन्यावर पडलेल्या एकेका पावलाचा ध्वनि पुढल्या पावलात मिसळत गेला. ध्वनींचा एक घुमारा क्षणभर इमारत व्यापून राहिला.
इमारतीच्या मोठ्या लाकडी दाराबाहेरील दोन पायऱ्या उतरून फुटपाथवर येताच असंख्य परिचित दैनंदिन आवाजांनी तिला नव्यानं घेरलं. ..आवाजांच्या या खडबडीत लयीतून शहराखाली जमीन, शहरावर आकाश उगवत रहातं, क्षणार्धात तुम्ही या चलचित्रात खेचले जाता.
सेत् च्या फरसबंदीवरून चालताना (विशेषतः गर्दीत) आपल्याच पावलांचा कानोसा घेणं तिला आवडे. भिजलेल्या फरशांवर मात्र बूट नेहेमीसारखे वाजत नाहीत. ..ज्युलिआं या बुटांना 'ठोकळे' म्हणाला होता! त्यांचा आवाज कसा ठाम मत मांडल्यागत वाटतो, हे सांगितलंच नाही मग त्याला तिनं.
रस्ता वळला तशी तीही काटकोनात उजवीकडे वळली. पुढलं डावं वळण अटळपणे समोर येईपर्यंत तिनं रस्ता ओलांडला नाही.
युद्धात या भागावर बॉम्ब पडला तेव्हापासून जमीनदोस्त झालेल्या इमारतींचे काही ढिगारे अगदी काल-परवापर्यंत होते इथे. आता बांधकामाच्या ढिगाऱ्यांनी फुटपाथ व्यापलाय. सुट्टीनिमित्त लोक शहराबाहेर गेलेत म्हणून किती बांधकामं काढावीत यांनी! मोठ्या रस्त्यांत, अगदी नापोलेआँ फाउंटनभवतीसुद्धा 'कोलोनिआल' मशीन्सची घरघर, ओल्या फडक्यांचं 'कार्पेट', धुरळा..
बोपासाज रस्त्यावर माणसं, गाड्या, टॅक्स्यांची वर्दळ जाणवू लागली. बहुतेक सारेजण मोठ्या आव्हेन्यूच्या दिशेने जात होते - कुणी एकटे, कुणी दुकटे. सामानाच्या पिशव्या घेऊन डुलत डुलत चालणारी एखादी जाडी, टर्टलनेक स्वेटरवाला एखादा उंचाड माणूस, क्वचित एखादी 'वेस्पा' रस्त्याला फुटलेल्या बोळात शिरून नाहीसे होत होते.
..सर्वच गाड्या काळ्या? ती रस्त्याकडे एकटक पहात होती. तिनं पावलं घासली तसा ओला पाचोळा खसखसला. काळ्याच काळ्या मोटारींचे ढब्बू मुंगळे. एकतरी लाल, निळी, पांढरी चुकार गाडी दिसावी, तर ते नाही! - किमान राखाडी? छे.
ज्युलिआंकडे
दोन्ही हातांच्या बोटांवर मोजता येण्याइतक्या गाड्या सहज असतील. 'गाडी
पाठवतोय' असं म्हणून फोन ठेवण्यापूर्वी कधीकधी तो विचारायचा: 'लं रूज उ लं
ब्लं? (लाल की निळी?) वेर पास्तेल उ लं क्रेम (पेस्टल ग्रीन, की क्रीम)?'
केस पुसता-पुसता, किंवा सिगारेटचा धूर सावकाश सोडत ती गाडीचा रंग ठरवायची.
'आज नव्या गाडीतून मॉसिअर लं वेर स्वतः येणार आहेत. ..हंss मादाम.' एके संध्याकाळी फोनवरून आपल्या नोकराची नक्कल करत ज्युलिआं म्हणाला.
'ठीक. रंग-?'
'पांढरा, हंसासारखा शुभ्रपांढरा.'
'मला नाही बसायचं पांढऱ्या गाडीत.' तिनं रिसीव्हर ठेवला.
तिची अपार्टमेंट (फ्रेंच फ्लॅट) इमारतीच्या मागल्या बाजूला होती. या बाजूच्या मोठ्या लाकडी दारातून गाड्या आत जाऊ शकत नसत. अपार्टमेंटच्या तीन छोट्या खोल्यांना दोन खिडक्या होत्या. एक रस्त्यालगत होती. दुसरीतून इमारतीच्या अंतर्भागी असलेलं खुलं आवार, त्यातली लिंडेनची तीन सरळसोट झाडं, आणि आवारापलीकडली, इमारतीच्या दर्शनी भागाची डागडुजी झालेली आतली बाजू दिसत असे.
हॉलमधल्या खिडकीखाली गाडी थांबल्याचा आवाज आल्यासरशी तिनं पडदा सारला. रस्त्यावरील दिव्याचा सुस्त उजेड शोषून घेत मोटार चमचमत होती.
"सभ्य असाल तर, मॉसिअर, रस्त्यावरून इशारे करू नका. आत या." खिडकीचं तावदान धाडकन् बंद झालं.
गाडीचं दार उघडलं. भेगाळलेल्या फुटपाथवर ज्युलिआं काळजीपूर्वक उतरला. थोडं वाकून त्यानं पँट सारखी केली, व काहीशा अवघडलेपणानं लाकडी दरवाजातून आत शिरला.
हाउसमानने गेल्या शतकात नटवलेलं पॅरिस हे नव्हे. चुनखडकातल्या एकसमान इमारती, निळी छपरं, सतत चमकवली जाणारी तावदानं, दुतर्फा लावलेल्या झाडांची शिस्त, सावध खडे असलेले दिव्यांचे खांब, भव्य ट्रॅफिक जॅम्स.. रुंद फुटपाथ, उंची रेस्तंरा, तिथली रुंद रकमांची बिलं भरणारे रूंद आमदनीचे श्रीमान हा पॅरिसचा चेहरा असेना का - चेहरा म्हणजे संपूर्ण शहर नव्हे. चालू विसाव्या शतकातील काँक्रिटच्या सपाट इमल्यांनीदेखील अद्याप इथं माना काढल्या नव्हत्या. हे जुनाट पॅरिस होतं: अरूंद गल्ल्यांचं; पोपडे उडालेल्या, काळवंडलेल्या वास्तूंचं; फारशी न बदलणारी अरूंद आमदनी असलेल्यांचं; जाता-येता काही सेकंदं तुमच्याकडे टक लावून पाहणाऱ्यांचं… विख्यात कथा-कादंबऱ्यांतून वर्णिलं गेलेलं, व अधिकाधिक वाचकांना कादंबरीतल्यापुरतंच भावणारं.. शहरातील नवं खूळ, नवा चळ अनुसरण्यात काही महिन्यांचा उशीर लावणारं, तरी आपल्या गतीनं पॅरिसमागं धावणारं पॅरिस.

ती झोपायच्या कपड्यांतच सोफ्यावर पसरली होती.
"खालच्या दाराला तेलपाणी केलं नाही वाटतं क्रिस्तोफनं, चांगलंच करकरतंय."
"परवा क्रिस्तोफोविच म्हणाला, 'जुन्या दरवाजांनी जुन्या दरवाजासारखं वागावं हेच उत्तम'. मी म्हटलं, कसं बोललास!"
ज्युलिआंनं खांदे उडवले. दारापासच्या आँफिलादवर हाताने रेलून तो उभा होता. भिंतीवरील दिव्याचा ठळक झोत त्याला टाळून पुढे गेल्याप्रमाणं बाजूला पडला होता. दहा-बारा पावलांच्या अंतरावरून दोघं एकमेकांकडे पाहत राहिले.
'कसा बरं जुळला हा संबंध? का म्हणून?' अधूनमधून तिला नवल वाटे. 'राँ पार दं' कॅबरेमधे देखण्या नर्तिका होत्या. ती तर फक्त गायची - काहीजणी 'सारंकाही' करायच्या. खरं म्हणजे तिचं गाणंदेखील अगत्यशील नव्हतं. 'स्वतःतच मश्गूल होऊन गातेस, अंग चोरतेस, गाण्यातून प्रेक्षकांशी संवाद साधत नाहीस' अशी टीका झाली होती तिच्यावर सुरुवातीला. तिला या आक्षेपांचं प्रयोजनच कळेना. 'मी गाते. कृपया मला गाऊ दे' - हे होतं तिचं उत्तर. 'आवाजात कुछ तो बात आहे' असं ऑर्केस्ट्रातील बऱ्याचजणांचं (आणि बॉसचं) मत पडल्यानं तिची नोकरी टिकली.
ज्युलिआं आणि ती - दोघांना गप्पांची आवड नव्हती. प्रेमप्रकरण वा लफड्याबद्दल बोलायचं, तर अनौपचारिकतेचा आव आणत परस्परांची खोदून माहिती काढल्यानं इथे विशेष काही साधत नाही. घडायचं ते घडतंच. ..त्या दोघांमधे घडणारा शाब्दिक संवाद हा जणू खेळ होता - जे अखंड चालू राहिल्याने काही बिघडलं नसतं, जे घडलंच नसतं तरी काही बिघडलं नसतं असं संभाषण.
आपण तल्लखबुद्धि इसम नाही, हे ज्युलिआं लं वेर ला पुरतं ठावूक होतं (- वडिलार्जित संपत्तीत त्याने पाडलेली भर 'देदीप्यमान' म्हणण्याइतकी देदीप्यमान नव्हती) व आपल्या बुद्धिचा सामान्यपणा इतरांच्या लक्षात आल्यास तो बिचकून आक्रमक होत नसे...म्हणूनच कदाचित.... तो फार संवेदनशील होता अशातला भाग नाही - उच्चभ्रू पुरुषांची जी घडण असते त्याच छापाचा जेंटलमॅन. पण त्याच्या घुमेपणात एक वेगळाच.. काय म्हणावं.. एकतऱ्हेचा धीर होता.
कदाचित याचमुळे त्या संध्याकाळी तिनं त्याची विनंती स्वीकारली. भारीचे पिनस्ट्राइप सूट घातलेली, कोणाहीसोबत नृत्य न करता कोपऱ्यात बसून राहिलेली ती दोन माणसं नेहेमीचं पब्लिक नव्हेत, इतकीच नोंद तिच्या नजरेनं केली होती.. आणि त्यातला एक तळहातावर चेहरा टेकवून आपल्याचकडे पाहतोय. पण चुटक्या नाहीत, तर्जनी हवेत घुमवणं नाही, अगदी सूचक स्मितदेखील नाही - केवळ ती स्थिर दृष्टी.

नंतर तिला पाठवण्यात आलेली चिठ्ठी: तुम्ही 'जगा व जगू द्या' या कोटीतली स्त्री असलात, आणि जर तुमचं गाणं संपताच आपली भेट झाली तर मला आनंद होईल. - दारात गाडी उभी असेल.)
तिनं टच-अप करता करता चिठ्ठी वाचली, कोटाच्या खिशात टाकली. बाहेर येऊन पुढचं गाणं घेतलं:
'जं न मार्श जामे स्यूर देज एपीन साँ सेन्ये
जं न मार्श जामे साँजेपीन सू मे पिए
मे सं सेन्ये, से पा लं ब्यूत जामे...'
जं न मार्श जामे साँजेपीन सू मे पिए
मे सं सेन्ये, से पा लं ब्यूत जामे...'
(पावलं रक्ताळल्याखेरीज काट्यांवरून चालता येत नाही / काट्यांवर चालल्याखेरीज मला चालताच येत नाही / रक्ताळून घेणं हा उद्देश नसतो माझा कधी)
तळघरातील
'राँ पार दं'च्या पायऱ्या चढून ती वर आली. रस्त्यापलिकडे एक शेवरोले गाडी
उठून दिसत होती, मोटारींच्या माळेतला रत्नखडा जणू. पांढऱ्या जाकिटातला शोफर
पायाखाली थोटूक चिरडत इकडे-तिकडे पाहत होता. ती जवळ येताच त्यानं त्वरेनं
मागचं दार उघडून धरलं.
"कुठे चाललोत आपण?" गाडी थांबण्याचं नाव घेत नाही असं पाहून तिनं विचारलं.
"बाँजूर मादाम. आपण नैऋत्येला चाललोत."
हं. नैऋत्य म्हणजे क्षितिजावर जिथेतिथे उगवलेली स्मारकं, ओपेरा हाउस, दीर्घ प्रोमंनाद (पायी फेरफटका मारण्याची सोय), आयफेल टॉवरशी जवळीक.. विलासितेचं राज्य आणि गतविलासाच्या खुणा. सेन नदीच्या डाव्या बाजूला तसली खाजगी उद्यानं, खाजगी दफनक्षेत्रं, सुटसुटीत बंगले तुलनेनं दुर्मिळ. नैऋत्य भागाला 'रीव्ह द्रुआत् दं ला रीव्ह गोश' (डाव्या किनाऱ्याचा उजवा किनारा) म्हणलं जाई.
"इथे डाव्या किनाऱ्यावर काय काम काढलंत, हा प्रश्न विचारू शकते का मी - तुम्ही उत्तर देणार नसलात तरी?" दंब्रिन्याक् शँपेनचा घोट घेत ती नाटकी शिष्टपणानं म्हणाली होती.
"घरापासून दूर एक घर घ्यावं म्हणतो," ज्युलिआं उत्तरला.

"घरापासून दूर...?"
"...ऱ्यू दं रिव्होली-?"
"अं?"
"ऱ्यू दं रिव्होलीपासून दूर."
तिला हसू आवरलं नाही. "पॅरिसपासून पॅरिस कितीसं दूर आहे, सांगा बरं?"
"ओह, वाट्टेल तितकं दूर असू शकतं ते," तो म्हणाला होता.

अखेर दहा-बारा पावलांचं अंतर पार करून ज्युलिआं सोफ्याशेजारच्या सोफाखुर्चीत येऊन बसला. त्यानं हात पुढे केला.
तिनं नुसताच त्याच्यावर कटाक्ष टाकला - दंव पडल्यागत चमकणारा नाकाचा शेंडा, कोटात न लपणारा खांद्यांचा गोलवा, 'पिनो'चं पोमेड लावून मागे सारलेले सुळसुळीत केस, खोट्या वाटणाऱ्या जाड भुवयांखाली करूण भासणारे डोळे, प्रत्येक हालचालीत 'रामाज' पर्फ्यूमचा गंध... कुठवर चालणार हा खेळ? - पण काय खेळ आहे नै! शरणागतीत केवढी ही उत्कंठा! विजयाच्या मल्मलीत खुपणारी उदासी! महिन्यातून एकदा, कधी आठवड्यातून एकदा, त्यानं फोन केला की ती भुर्र. कॅबरेकडून तिचा वेळ विकत घेण्यात त्याला कसलीच अडचण नव्हती.
त्याच्या पुढे केलेल्या हाताकडे बघत सोफ्यावरून, गालिच्यावरून सरपटतच ती त्याच्या मांडीवर जाऊन पहोचली.
"उडे चाल्लोत आबण?" चुंबन घेता-घेताच तिनं विचारलं. “सिनेमा? ...पार्टी? ...शँपेन, चांदीचे चमचे, कंटाळवाणे चेहरे? 'महत्त्वाची' बोलणी करता करता बायका न्याहाळणं?”

“- एक करार मोडायचाय."
"करार मोडतानाही एवढं नटावं लागतं?" तिनं त्याच्या छातीवर टायची गुंडाळी केली.
"बायकासुद्धा न्याहाळतात ना आम्हाला. नटायला तर हवंच," बोटांच्या चिमटीने टाय सोडवून घेत तो म्हणाला.

"मग मला कशाला नेतोस सोबत?"
"कुठल्याच बाईनं आमच्याकडं पाहिलं नाही तर -? आणि तुमच्याकडेही कुणी पाहिलं नाही, तर??"
"माझं नै कै अडत कुणी माझ्याकडं पाहिलं नाही तर." ती तयार होण्याकरता आत निघून गेली..
त्यानंतर साधारण आठवड्याभराने संध्याकाळी काळ्याशुद्ध 'हॉचकिस 686'चं अप्रतिम मॉडेल तिच्या खिडकीखाली येऊन थांबलं. तिला मुळी कल्पना नव्हती. न थांबता हॉर्न वाजत राहिला तशी ती खाली डोकावली. ड्रायव्हर्स सीटकडे बघून खात्री करताच तिचा चेहरा खिडकीतून गायब झाला. ती धावतच खाली आली.

तो
गाडीतून उतरला होता. रस्त्याने जाणारी तुरळक माणसं जुन्या गाडीचा तो पुष्ट
घाट, तो डामडौल डोळ्यांत साठवून घेत होती, त्या चांदणरातीत क्षणैक बुडी
मारत होती. "तू 'हॉचकिस' घेतलीस! 'हॉचकिस'!... अगदी त्या
फिल्ममधल्यासारखी!" आश्चर्याने दोन्ही हात तोंडावर ठेवून ती गाडीभवती
फिरली. रिंगण पूर्ण करत त्याच्यापुढे उभी राहिली.
"दोन युद्धं झाली म्हणजे युरोपातल्या देखण्या गाड्या खलास झाल्या असं नव्हे!" ज्युलिआं खुषीत होता.
"जोपर्यंत तुझ्यापाशी ही गाडी असेल तोपर्यंत मी तुझ्या प्रेमात राहीन."
"- तोपर्यंतच?" त्यानं हसत विचारलं.
तिनं होकारार्थी मान हालवली.

धक्का
बसल्यानं ती भानावर आली. ..अच्छा, बोर्निओल आळी. कोणत्याही क्षणी
एकमेकांना घसटतील, धडकतील इतक्या जवळून बेधडक चालणारी माणसं. बहुतेकांच्या
अंगावर पावसाळी ट्रेंचकोट. आपला चालण्याचा वेग मंदावल्यामुळे कुणाशीतरी
टक्कर होऊन डावा खांदा दुखावलाय. खांदा चोळत तिनं गर्दीचा वेग पकडला.
दुकानांच्या काचा पावसामुळे धुरकटल्या होत्या, काहींवर अद्याप थेंबांचा पडदा होता. मासिकविक्रेती आपल्या टपरीपुढे साचलेलं पाणी फुटपाथवरून रस्त्यावर सारत होती - वळसा घालून जाणं भाग होतं. गाड्यांचे पोंगे एकमेकांवर ताण करत होते. सायकल हाकणाऱ्या बारक्या मुलामागून एक मुलगी - बहुधा त्याची बहीण - स्केट करत होती, त्याच्या कोटाचं फडफडतं टोक धरू पाहत होती. दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात प्लेन ट्रीच्या खोडावर सावल्यांचे तुकडे विखुरले होते. फ्रित खाणाऱ्यांच्या कोंडाळ्यातून खमंग वासाच्या वाफा येत होत्या. दुकानाबाहेर स्टूल टाकून प्रेव्हो मांजरीला कुरवाळत बसला होता - सगळ्या नऊच्या नऊ मांजरी गोळा होईपर्यंत तो दुकान बंद करणार नाही. प्रेव्हो तिच्याकडे पाहून डोक्यावरची बसकी टोपी उचलत हसला, शेजारच्या रोशे शिंपिणीनंही हसून हात हलवला - प्रतिक्रिया देण्याचं सुचेपर्यंत पावलं तिला पुढे घेऊन गेली होती.
हाताला धरून खेचल्याप्रमाणं ती झटकन् बाजूला झाली. समोरून टुकुटुकु येणाऱ्या, लोकरी स्वेटर घातलेल्या आजीबाईशी धडक होता होता वाचली. माफी मागायला वळताच तिच्या पाठीकडे रोखून बघणाऱ्या आजीबाईनं मान फिरवली. क्षणापूर्वी आजीबाईचा मऊ सुरकुत्यांनी भरलेला चेहरा किती जवळ आला होता, याची तिला जाणीव झाली. फूल हुंगताना चेहरा अगदी, अगदी जवळ नेला, की शिरांचं अस्संच जाळं दिसतं नै?

ज्युलिआंच्या
बागेत तिच्या आवडीची सगळी फ्रेंच फुलं फुलत - हळवं आयरिस, अनेक प्रकारचे
गुलाब, लाजऱ्या म्युगे-लिली.. पोलोनियाचे झुबके, उंचावर मॅग्नोलियाचा
बहर...
'बुलवार
सांत-मारी' (पथ). होम अप्लायंसेसच्या मोठ्या दुकानाबाहेर आळसावलेल्या
रखवालदाराची नजर पुन्हापुन्हा तिच्या पुटपुटणाऱ्या ओठांकडे जात होती. ..काय
पुटपुटतोय आपण?
... एप्रिलमधल्या त्या शांत दुपारी ती ज्युलिआंच्या व्हिलाच्या संगमरवरी पायऱ्यांवर उभी होती. सारखा आकार दिलेल्या झुडपांप्रमाणे दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शोभून दिसणारे दोन दरवान - पास्काल आणि रोबेर - त्यांनी तिला अडवलं. "माफ करा मादमुआझेल. तुम्हाला आत जाता येणार नाही. मॉसिअर लं वेरचा तसा हुकूम आहे."

"रोबेर आणि पास्काल, माझ्या लाडक्यांनो! तुमच्या 'मॉसिअर लं वेर'नी वेळ दिलीय मला, आणि मी पाळलीय ती!"
"पण त्यांनी सांगितलंय, आत्ता कुणालाही आत घ्यायचं नाही - मादमुआझेल द्यूराँना सुद्धा नाही."
"'मादमुआझेल द्यूराँ' - असं म्हणाला ज्युलिआं?"
त्यानं तिचा आडनावानिशी उल्लेख केलेला ऐकणं गंमतीशीर होतं. मुख्य म्हणजे ते तिचं आडनाव नव्हतंच. तिच्या दाराशेजारची 'द्यूराँ' ही पाटी पूर्वीच्या भाडेकरूनं लावली होती, जी काढून टाकण्याची तसदी तिनं घेतली नव्हती. ज्युलिआंला सांगितलं होतं तिनं, त्यावर त्यानं खांदे उडवले......नाही का? ..आठवत नाही.

गारवा
चांगलाच वाढलाय. तिनं कोट अंगाभवती आवळून घेतला, मुठी बाह्यांत आकसून
घेतल्या. ह्म, ग्लव्ह्ज घालायचे राहून गेले. बाकांवर बसून वा उभ्या उभ्याच
मिठीत गुंतलेली जोडपी. 'पॅरिसच्या रस्त्यांवर सर्वाधिक आदर केला जात असेल
तर तो चुंबन घेणाऱ्यांचा', ज्युलिआं मिश्किलपणे म्हणायचा.
ते
विद्यार्थी, प्रेमी युगुलं, चवड्यांवर धावणारे बो टायमधले वेटर्स, दंडुके
फिरवणारे ट्रॅफिक पोलिस, त्यांच्याभवतीची रहदारी.. सगळं तेच, तेच ते.. सरळ
रस्त्यांना जाऊन मिळणारे सरळ रस्ते.
"मॉसिअर लं वेरचा निरोप आहे तुमच्यासाठी."
तिनं दचकून सभोवार पाहिलं. या इथे कुणी हे शब्द उच्चारले असणं शक्यच नव्हतं. रस्त्यावरल्या गजबजाटात कुणी तिच्याशी अक्षरानंही बोललं नव्हतं. आईचा हात धरून अडखळत येणारं एक लहान मूल तिच्याकडे टकामका पाहत होतं. आई आपल्या नादात.
"..अच्छा?"

रोबेरनं तिला चिठ्ठी देऊ केली:
केव्हातरी हे घडण्याची शक्यता होती - सत्य तूदेखील नाकारणार नाहीस. ..ज्यापद्धतीनं आपल्याला दूर व्हावं लागतंय त्याचं मला दुःख आहे.
हे माफीलायक वर्तन नाही, तरी आज मी केवळ माफीच मागू शकतो.

तुझा, ज्युलिआं
वरच्या
मजल्यावर खिडकीजवळ खुर्ची सरकवल्याचा आवाज तर झाला नाही? भिंतींच्या
पडद्याआड लपून ज्युलिआं ही क्रूर थट्टा पहात होता की काय??
पावलं
लटपटू लागलीत. ती थकून गेली होती, तिला आधार हवा होता. सिगारेट ओढायची
होती पण जाऊन विकत घेण्याची इच्छा नव्हती. सुईतून धागा सरकावा तशी ती
भवतालातून सरकत होती. काळोख्या कोपऱ्यात तो धिप्पाड जाकिटवाला मनुष्य.
विचारांत हरवलाय. त्याची सिगारेट पेटत नाहीय. कॅमल कोटातला तो चेलोवादक,
वाद्याच्या पेटीशेजारी कुडकुडत थांबलेला.... जणू ती भुतासारखी साऱ्यातून
आरपार जात होती. डोळ्यांपुढून उलटणाऱ्या एकेका चेहऱ्यावर, वस्तूवर,
प्रसंगावर जणू तिचं सुख, तिचं दुःख, तिच्या असंख्य आठवणींचे थर दाटत होते.
तंद्री भंग पावत होती खरी - हालणाऱ्या, हासणाऱ्या, ओरडणाऱ्या, नाचणाऱ्या
दृष्यांतून चालू क्षण आपलं अस्तित्व जाणवून देत होता; शब्द, हातवारे,
तिच्याचसारखी एखादी अन्यमनस्क नजर तिला वर्तमानात आणत होती. ती आपली मुद्रा
सावरे, आवंढा गिळे, पुटपुट थांबवी... निमिषार्धात पुन्हा हरवून जाई.
दरवाजातून
ती आत घुसणार इतक्यात रोबेर व पास्कालनं दोन्ही बाजूंनी तिचे दंड धरले.
शक्य तेवढ्या सभ्यपणे ते तिला पायऱ्यांच्या दिशेने ढकलू लागले.
"सोडा मला, भेटू द्या त्याला.. बोलायचंय त्याच्याशी - मला बोलायचंय तुझ्याशी!" ती किंचाळली.
का फुटले असावेत आपल्या तोंडून ते शब्द? ..आता बोलण्यासारखं काय होतं? जे घडलं ते आणखी बऱ्या प्रकारे घडू शकलं असतं का?

'ले सिझो' चौकात पहोचली होती. उजवीकडे गेल्यास सिनेमाहॉल. डावा रस्ता जातो
लागाश स्टेशनकडे. सरळ रेषेत चौक ओलांडावा. गाड्यांच्या रांगेतील फटीतून ती
पलिकडल्या फुटपाथवर आली, तोच अवघ्या काही फुटांवर, पार्किंगमधील एकमेव
रिकाम्या जागेत काळीशार हॉचकिस 686 येऊन थांबली.
"ज्युलिआं!" तिच्या तोंडून हाक निसटली.
गडद ट्वीडचा ओव्हरकोट घातलेला पुरुष व स्त्री गाडीतून खाली उतरली. हातात हात गुंफून दोघं 'रेस्तंराँ वेलूर'च्या दिशेने निघाली. नक्षीदार काचेआड लुप्त होणाऱ्या त्या दोन आकृत्यांकडे पहाता पहाता ती आपसूक गाडीजवळ गेली. अश्रू पुसावेत इतक्या अलगद तिची बोटं गाडीच्या ओलसर फेंडरवरून फिरली.
गर्रकन वळून झपझप पावलं टाकत ती आल्या वाटेने परत निघाली.
'ज्युलिआं!' - एकाकी उद्गार रात्रीवर केशरी चंद्रकोरीसारखा उमटला, व नाहीसा झाला.

Comments
Post a Comment