कमलतारा - एक ब्राझिलियन लोककथा

* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. * वनस्पतितज्ञ प्रा. हेमा साने यांच्या 'कमळ' नामक पुस्तिकेत राजकमळाबद्दल (जायंट वॉटर लिली - Victoria amazonica / Victoria regia) सुरस माहिती वाचायला मिळते. डुंगी च्या (छोटी होडी) आकाराची अजस्र पानं हे या कमळाचं मुख्य वैशिष्ट्य. पानाचा व्यास दोन मीटरहून अधिक, जाडी जवळपास एक ते दोन मिलिमीटर, आणि वाढीचा वेग ताशी एक इंच! पूर्ण वाढलेलं राजकमळाचं पान सहाशे ते सातशे चौरस फूट भरतं. शिरा व बरगड्यांमुळे निर्माण झालेली जाळीदार नक्षी पानाच्या खालच्या भागाला शोभा आणते. कमळाचं परागण भुंग्यांमार्फत होतं. ज्या रात्री फूल उमलतं त्या रात्री त्याचा रंग धवल असतो. दुसऱ्या दिवशी त्यावर सुरेख गुलाबी रंग चढतो. न मोडता, न वाकता हे प्रचंड पान १०० ते १२५ किलो वजन पेलू शकतं! सानेबाईंनी ब्राझीलमधील टुपी-ग्वारानी समाजात या फुलाविषयी प्रचलित असलेल्या लोककथेचा उल्लेख केला आहे, ती अशी: दूरवरच्या टेकड्यांवर चंद्रदेव दिसतो. रात्री तो आपल्या प्रियतमांबरोबर भटकंती करतो. पृथ्वीवरील कुणी सुंदर स्त्री त्याच्या नजरेत भ...