Posts

Image
No, that's not how Mr. Salamander would sleep. He'd lay flat as a pat.  He won't get up to pee, nor sip water afterwards.   A pure quake - sweat gathering on dorsal palms - an awful jolt - nothing. A man lays dying; or, fast asleep. Please don't ask me any further. I have to cross worlds for language and grammar in this dead of the night.   Where am I brought?  Dreadful snorting, chomping, howling, empty gurgling: Guards pacing at the gates of Hell? Pigs and wolves wearing armour? It's the man and wife snoring.  You've thoroughly lost your voice like the contents of Mr. Salamander's toolbox or better, his voice-box.   Eyes, eyes, how you hurt me, yellow and glum! Who will dunk you back into sleep?     Picture Credits: Not me

आन्द्रेइ् तार्कोव्स्की तरुणांना उद्देशून...

Image
      आन्द्रेइ् तार्कोव्स्की: थोर रशियन सिनेदिग्दर्शक. दोनातेल्ला बायिल्वो या इटालियन दिग्दर्शिकेनं १९८४ साली त्याच्यावर 'उन पोएता नेल चिनेमा: आन्द्रेइ् तार्कोव्स्की' (Andrei Tarkovsky: A Poet In the Cinema) नामक माहितीपट चित्रित केला. माहितीपटात एके ठिकाणी "तरुण पिढीला काय सांगशील?" असा प्रश्न विचारला जातो. झाडाच्या बुंध्यावर सरड्यासारखा भासणारा तार्कोव्स्की म्हणतो:  "एकांतावर प्रेम करायला शिका. स्वतःसोबत एकांतात आणखी वेळ घालवा. तरुणाईबाबतची एक समस्या म्हणजे एकटेपण जाणवू नये म्हणून ही मंडळी धिंगाणा घालतात, कर्कश आक्रमकतेने वागतात, दांडगाई करतात. दुर्दैवी आहे ते. माणसानं लहान वयापासूनच आपापलं रहायला शिकलं पाहिजे. म्हणजे एकाकीपणा नव्हे, तर स्वतःचा कंटाळा न येणं. स्वतःशी रमता न येणं, स्वतःपासून पळ काढावासा वाटणं हे फार भयंकर लक्षण आहे...रोगच आहे म्हणा ना." https://www.youtube.com/watch?v=bEpkrrmXTAE

शान्ता ज. शेळके यांनी सांगितलेला एक प्रसंग

बालपणीचा एक प्रसंग शान्ताबाईंनी आपल्या ललितलेखात वर्णिलेला आहे: एकदा नात्यातल्या, की ओळखीतल्या एक बाई घरी आल्या. शान्तेची आई व त्या बाईंच्या गप्पा चालल्या. आईच्या गळ्यात नव्यानंच घडवलेली टपोऱ्या मण्यांची मोहनमाळ होती. बाईंचं लक्ष चटकन् माळेकडे गेलं. "..नवीन घडवलीत वाटतं मोहनमाळ." "हो. नवीच आहे." "मणी टप्पोरे आहेत की. लाखेचे असतील. एवढे मोठे मणी शुद्ध सोन्याचे कसे असणार!" आई काहीच बोलली नाही. नुसती हसली. यामुळे त्या बाईंना कसलंसं अगम्य समाधान वाटलं असावं. त्यांच्या मुद्रेवर ते स्पष्ट झळकत होतं. चहा-खाणं झाल्यानंतर बाई आपल्या घरी निघून गेल्या. लहानग्या शान्तीनं प्रश्न केला: "आई, लाखेचे मणी म्हणजे काय गं?" "अगं, लाख नावाचा एक पदार्थ असतो. सोनं परवडत नसेल तर या लाखेचे मणी बनवतात आणि वरून सोन्याचा पातळ पत्रा चढवतात फक्त."  "तुझ्या माळेचले मणी लाखेचे आहेत??" मोहनमाळेकडं संशयानं पहात शान्तेनं विचारलं. एखादी वस्तू आपल्याला वाटली तितक्या मोलाची नाही या भावनेनं तिचा हिरमोड झाला होता. शान्तेचा उतरू लागलेला चेहरा पाहून आईला हसू कोसळलं. ...

A short note to myself

The question whether I can teach (anything) is linked intimately with whether I can learn. Have you the energy, the curiosity, the patience, the humility? There's no teacher, really. Anyone who takes up the task/title of a teacher has only to nurture the atmosphere of learning, to oil the wick of awareness in oneself and in the student.

दहा निघाले की एखादा पहोचतो!

काही शतकांपूर्वीची गोष्ट. तिबेटमधील एका मोठ्या बौद्ध आश्रमानं सीमावर्ती भागातील एका छोट्या आश्रमाच्या उभारणीस हातभार लावला. बांधकाम पूर्ण झालं. आता तेथील प्रमुखपद सांभाळण्याकरता योग्य भिक्षु पाठवणं तेवढं बाकी होतं. मोठ्या आश्रमाच्या प्रमुखानं दहा भिक्षुंची निवड केली, त्यांना नव्या आश्रमाच्या दिशेनं पाठवलं. सर्वांना प्रश्न पडला: 'गुरुपद ग्रहण करण्यासाठी एकाच व्यक्तीची गरज असताना दहाजणांना का बरं  धाडण्यात आलं? तिकडूनही प्रश्न आला: 'एकाचीच गरज असताना दहाजण कशाला? त्यांतील योग्य कोण ते आम्ही कसं ओळखावं?' "जरा धीर धरा. पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल," इकडचे गुरु म्हणाले. दोन्ही आश्रमांमध्ये पुष्कळ अंतर होतं. मार्ग खडतर, पहाडी होता - पायी प्रवास. साधारण तीन आठवड्यानंतर तिकडून निरोप आला: 'तुम्ही जे दहा भिक्षु पाठवले होते त्यातील एकच सुखरूप पहोचला आहे.' तेव्हा गुरु म्हणाले, "पाहिलंत? दहा पाठवले की एखादा पहोचतो !" मागाहून सर्वांना पूर्ण कथा समजली: दहा भिक्षुंच्या गटाला प्रवासात पहिलं गाव लागलं तेव्हा गावच्या वेशीपाशीच एका गावकऱ्यानं सर्वांत पुढे चालणाऱ्य...

Magic of Meaning

'Meaning-making' happens at the expense of implicit meaning - meaning which is already present in a poem, in a painting, a film, a novel etc. Subtle or pronounced, it shall come upon you in its own way, in its own time - all you have to do is to be there, be aware, be naked, listening, watching, receptive. It shall often ferry you to the realm of silence, through the landscape of your own self. You can't make anything out of this import, so light yet so charged it is! and solid like a tree laden with fruit! You shall fail to 'capture' this significance. Your words shall repudiate you,  your tongue shall misstate you. 'Let me explain more, let me illustrate further,' you may think. But that never was the issue. You tried to express the inexpressible. You didn't leave room for silence and surprises, you didn't let the snorts and sighs and tears and laughter take over.. you didn't let the enchantment work. Who asked you to take the entire burd...

On virtue of films

 A good film is what she is. And that's enough. She feels no need to shout from the rooftop, to turn you towards herself. Some people, it's their job - she doesn't mind them doing it for her. That's alright. A good film doesn't try to 'hook' you. A bad film, a premature work may seek to be attractive because, for her, the sheer fact of existence isn't a good enough reason to be. A good film may captivate you, it may fail to captivate you. She wouldn't try. She wouldn't beg and, trust me, she never wants you to beg. She is not decidedly inaccessible or upsetting. She doesn't mystify herself on purpose. That would be just another way of trying to hook you - what's the need! ...Someone wished to talk of things that touched them, moved them; to talk from their gut. They managed to get the kind of producers, the kind of finance required; a good casting director, good actors, good cameraman, good composer - and a film happened. Of cour...

Consent in romance

Consent is part of that honesty in relationship, is it not? And honesty is so superficially understood! But we've build a concept, a defensive wall out of consent now. We've turned it into a guard, and we forget how complex, or simple it could be. Consent is to listen, to respect the other person even in the heat of one's own passion; an understanding of a sort, no? When love is, this happens more or less easily. But we've made consent into a discourse, a big fuss. This way it stinks.   It seems to me that human sexuality in urban times and spaces is getting duller on one hand, and more violent on the other. The damages in relationship are getting quicker, uglier and more irreparable, just like the numerous consumer products we use. Disconnect from nature, from its vast expanses, from its challenges certainly makes us excessively intellect-driven. And intellect alone can't help.  We don't understand what to do with our own animality, how to relate to ourselves...

नखचोखी मुंगी

Image
मी नखं कापून एका जागी रचून ठेवली व काही मिनिटांकरता दुसऱ्या कामात गुंतले. नखं गोळा करू म्हटलं तेव्हा एक मुंगी नखावर चढून काहीतरी करताना (खाताना / चोखताना) दिसली. नखं मोजून पाहते तर दोन तीन कोरी गायब झालेल्या! थोड्या अंतरावर मुंग्यांची रांग भिंतीतल्या फटीत चालली होती. कदाचित त्यांनी नेली असावीत. ही  मुंगी मात्र जरा अधीर असावी, किंवा गर्दी टाळत असावी, कुणास ठावूक! पण ती नक्की काय करत होती? कशासाठी? आपली नखं 'केराटिन' नावाच्या कठीण प्रथिनानं बनलेली असतात. मुंग्यांना हे पचण्यास फार जड. परंतु कापलेल्या नखांतले मृत त्वचेचे अंश, काही प्रकारची बुरशी, (आपण हाताने जेवत असू / स्वयंपाक करत असू तर) अन्नाचे सूक्ष्मांश वा तत्सम जैविक घटक मुंग्यांच्या दृष्टीने खाण्यालायक असतात. त्यामुळे मुंग्यांच्या खाद्य-बेगमीत आपल्या नखांचा समावेश असल्यास आश्चर्य वाटायला नको! पश्चिम गोलार्धात आढळणाऱ्या 'अटिना' उपकुळातील मुंग्या पेशानं शेतकरी, पोषणासाठी बुरशीची लागवड करणाऱ्या.  ही बुरशी केराटिनचं विघटन करू शकते, त्यामुळे या मुंग्या 'बुरशीचा खाऊ' म्हणून मानवी नखं वापरत असाव्यात. भारतातील ...

मॅडम ब्लावात्च्का व प्रेमाच्या बीया

Image
प्रेम देणं, प्रेम करणं हा खरोखर सुंदर अनुभव असतो. तिथे तुम्ही महाराजा, महाधिपती असता. तुमच्यापाशी अमर्याद  खजिना असतो. तुम्ही तो मनसोक्त वाटू शकता. 'केव्हातरी हा खजिना रिता झाला तर!' अशी चिंता मुळीच करू नका. तसं होत नाही. प्रेम हे परिमाण नव्हे, तो भाव आहे, गुण आहे. प्रेमाच्या खजिन्याची अद्भुतता अशी की तो दिल्याने वाढतो, आणि कंजूषपणे स्वतःजवळ राखून ठेवल्याने कुजतो, निकामी होतो. तेव्हा प्रेमाबाबत काटकसर करू नका, उधळखोर व्हा! आपण प्रेमाचा वर्षाव कोणावर करताहोत याची फिकीर करू नका - 'मी विशिष्ट लोकांवरच प्रेम करेन' हा विचार कोत्या मनाचं लक्षण असतं. 'कुणी मागितलं तर मी देईन' म्हणून खोळंबून राहू नका - प्रेम द्या! देत रहा! थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापिका मॅडम ब्लावात्च्का  (इंग्रजी उच्चारानुसार हेलेना ब्लावस्की )  जगभर प्रवास करत असत. त्यांना एक सवय होती. रेल्वे प्रवासात त्या बीयांच्या पिशव्या बाळगत, खिडकीजवळ बसून पिशवीतून बीया बाहेर फेकत. लोक विचारत, "हे काय करताहात?" "मी फुलझाडांच्या बीया विखुरतेय. यातील काही बीया नक्की रुजतील, त्यांची रोपं होतील,...