Posts

Films I admire

El laberinto del fauno (Spanish: Pan's Labyrinth ) - Guillermo del Toro, 2006 Fanny och Alexander (Swedish: Fanny and Alexander ) - Ingmar Bergman, 1982    Det sjunde inseglet (Swedish: The Seventh Seal ) - Ingmar Bergman, 1957 Persona - Ingmar Bergman, 1966   Trollflöjten ( Swedish: The Magic Flute ) - Ingmar Bergman, 1975 Klimt   - Raúl Ruiz, 2006  Don Juan en los infiernos (Spanish: Don Juan in Hell ) - Gonzalo Suárez, 1991 Remando al viento ( Spanish: Rowing with the Wind ) - Gonzalo Suárez, 1988  La Grande Illusion (French : The Grand Illusion) - Jean Renoir, 1937 This Land Is Mine - Jean Renoir, 1943 The Night of the Hunter - Charles Laughton, 1955   Rembrandt - Alexander Korda, 1936 Caravaggio - Derek Jarman, 1986  Wittgenstein - Derek Jarman, 1993    Le Carrosse d'or ( French : The Golden Coach) - Jean Renoir, 1953  Les Bas-fonds ( French : The Lower Depths) - Jean Renoir, 1936 Partie d...

नाटक नाटकी असलंच पाहिजे का?

Image
* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय.   कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*     नाटक नाटकी असलंच पाहिजे का?  नाटकांच्या नाटकीपणाचा एखाद्याला वैताग येत असेल तर? - एखाद्याला म्हणजे मला.  होय, नाटकाच्या सादरीकरणातील, विशेषतः अभिनयातील नाट्यातिरेकाचा मला वीट येतो. नाटकांच्या गावी फारशी जात नाही मी. (प्रस्तुत लेखनाला किती महत्त्व द्यायचं, हे वाचणाऱ्यानं स्वतः ठरवावं!)  परंतु नाटक लिहीण्याची हुक्की आली म्हटल्यावर तंबूत शिरायलाच हवं. आजवर पुण्यातच पाहिलेल्या मोजक्या प्रायोगिक नाटकांपैकी (- व्यावसायिक नाटकांमुळे मेंदूचं आरोग्य बिघडण्याचा धोका वाटतो -) मानव कौल ची नाटकं वगळता बहुतांश नाट्याविष्कार संहितेत कच्चे व (म्हणूनच की काय) सादरीकरणात कर्कश, छापपाडू वाटले. (गोळीबंद संहिता, तडाखेबाज सादरीकरणातून काळजाला भिडलेलं परंतु काळजात भिनू न शकलेलं एक नाटक म्हणजे 'दि कंपनी थिएटर'चं 'टेकिंग साइड्स'.)   'दि ट्रायलॉग स्टुडिओ' निर्मित 'तानसेन' नाटकाचा समावेश माझ्यामते दुर्दैवानं  या जंत्रीत ह...

Untitled

 * I am re-posting this old post due to change of email account. *     When Tara asked us - with her eyes closed - our eyes to close; to put one hand on our belly and the other on our heart, I wondered why the left hand went down and the right one arose until after a few minutes, when it felt kind of like an embrace. That’s what it was about, I suppose. At least that's what the arms chose.    © Mukta Asnikar This poem got published in the December 2022 issue of the 'Doublespeak' magazine: https://dsmag.in/2022/12/28/mukta-ansikars-untitled-poem/

असुरक्षितता हेच नातेसंबंधाचं वैभव (in Marathi and English)

Image
 * I am re-posting this old post due to change of email account. * * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *       (दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जे. कृष्णमूर्तींच्या दैनंदिनीतून)   H. म्हणाला, की नातेसंबंध ही त्याला भीषण तापदायी, कटकटीची बाब वाटते. सुरुवातीला नात्यात एकतऱ्हेचा गोडवा असतो, पण लवकरच मतभेद, कलह, दुःखाचा त्यात शिरकाव होतो. या धुमश्चक्रीतून बाहेर कसं पडता येईल, हा H. चा प्रश्न होता.   अस्तित्वात असणं म्हणजेच उर्वरित विश्वाशी संबंधित असणं. साऱ्याच परस्परसंबंधात वेदना असते. नात्यात खळबळ, क्षोभ, अस्वस्थतेचे तरंग उमटणं नैसर्गिक आहे - नातेसंबंधाचा स्वभावच असतो हा. मनातल्या मनात तुम्ही आदर्श नात्याचं चित्र रेखाल भले, पण वास्तवापासून, तथ्यापासून काढलेली पळवाट असते ती फक्त. बुद्धिजन्य आदर्शांमुळे समायोजनाची (adjustment), संघर्षापलिकडे जाण्याची शक्यता मावळू लागते. आकृतिबंधाला, पठडीला बोधाहून जास्त महत्त्व प्राप्त होतं. ...परस्परसंबंधांत दुःख-क्लेश अपरिहार्य असतात - रोजच्या जगण्यात आढळतंच आपल्याला ते. नात्यात तणाव नसेल तर त...

डोळ्यांदेखत आपल्या मित्रावर हल्ला झालेलं तुम्ही खपवून घ्याल का?

Image
 * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *     प्रश्न: हिंसेविषयी तुम्ही पुष्कळ बोलता. डोळ्यांदेखत आपल्या मित्रावर हल्ला झालेलं तुम्ही खपवून घ्याल का?        जे. कृष्णमूर्ती: ...जुनापुराणा सवाल आहे. 'तुमच्या डोळ्यांदेखत कुणी तुमच्या बहिणीवर हल्ला केल्यास तुम्ही काय कराल?'  हो की नाही? - तसलाच प्रश्न आहे हा.  तुम्ही काय कराल?  - हो, तुम्हाला विचारतोय मी. झोडपून काढाल त्याला? गोळी माराल? कराटे कराल?  'कराटे' शब्दाचा अर्थ माहितीय तुम्हाला? कोणीतरी मला हा शब्द उलगडून सांगितला: 'कराटे' म्हणजे 'स्व'चा अभाव. 'मी'पणाचा अभाव. स्व-संरक्षणात्मक युद्धकला नव्हे.  शोध घ्या, लोक हो.   तुम्ही आपल्या प्रेयसी, नवरा इत्यादीबरोबर आहात. कुणी इसम येऊन तुमच्या पती, पत्नीशी हिंसेने, क्रौर्याने वागू लागतो. सहजप्रेरणेने काय घडेल तुमच्या हातून? त्याच्यावर चालून जाल तुम्ही, हो ना? स्वाभाविक आहे. त्याला बदडून काढाल. कराटे, योगिक डावपेचांचं ज्ञान असल्यास हल्लेखोराला भुईसपाट कराल तुम्ही.  सामान्यतः अशा परिस्थितीत माणसाच...

घंटा घंटा घंटा घंटा घंटा - प्रतिकाराच्या थिटेपणाची!

Image
* ईमेल-खातं बदलल्यामुळे ही जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो. *       व्यावसायिक तथा चुचकारू प्रायोगिक नाटकांमधील ठोकळेबाज नेपथ्य, पटकथा, विनोद; बौद्धिक शिथिलता, राजकीय औदासीन्य, गबाळ वर्तमान संदर्भ इत्यादी घटकांना टक्कर देणारी नाटकवाली मंडळी पुण्यात दीडेक दशकांपासून सक्रिय आहेत. व्यक्तिगत कामं करता करता वेळोवेळी एकत्र येऊन हा कंपू नाट्यनिर्मिती करतो. ('कंपू' शब्द इथे तटस्थपणे वापरतेय मी.) खूप चांगली गोष्ट आहे. परंतु ही नाटकंसुद्धा ठोकळेबाज जाणीवांमधूनच उगम पावत असल्यामुळे - ते ठोकळे विजोड, विषमभुज, उत्तर-आधुनिक, अ‍ॅबस्ट्रॅक्ट धाटणीचे असले तरी; खुर्च्यांच्या पाठीला पट्ट्या कमी-जास्त असल्या, एकोणिसशेसाठ-सत्तरांतली  बंडखोर गाणी वाजली, मंचावर निर्धास्त चुंबनं झडली तरी - शेवटी 'यांचे' ठोकळे व 'त्यांचे' ठोकळे एवढाच काय तो फरक उरतो.  माझ्यामते बहुसंख्य नाटकांप्रमाणं या कंपूचं ना्ट्यदेखील झेप घेण्यास असमर्थ ठरतं. ते निराळ्या पद्धतीनं वावरतं, पंख फडफडवतं इतकंच.    सॅम...