असुरक्षितता हेच नातेसंबंधाचं वैभव (in Marathi and English)
* I am re-posting this old post due to change of email account. *
* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
(दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जे. कृष्णमूर्तींच्या दैनंदिनीतून)
H. म्हणाला,
की नातेसंबंध ही त्याला भीषण तापदायी, कटकटीची बाब वाटते. सुरुवातीला
नात्यात एकतऱ्हेचा गोडवा असतो, पण लवकरच मतभेद, कलह, दुःखाचा त्यात शिरकाव
होतो. या धुमश्चक्रीतून बाहेर कसं पडता येईल, हा H.चा प्रश्न होता.
अस्तित्वात
असणं म्हणजेच उर्वरित विश्वाशी संबंधित असणं. साऱ्याच परस्परसंबंधात वेदना
असते. नात्यात खळबळ, क्षोभ, अस्वस्थतेचे तरंग उमटणं नैसर्गिक आहे -
नातेसंबंधाचा स्वभावच असतो हा. मनातल्या मनात तुम्ही आदर्श नात्याचं चित्र
रेखाल भले, पण वास्तवापासून, तथ्यापासून काढलेली पळवाट असते ती फक्त.
बुद्धिजन्य आदर्शांमुळे समायोजनाची (adjustment), संघर्षापलिकडे जाण्याची
शक्यता मावळू लागते. आकृतिबंधाला, पठडीला बोधाहून जास्त महत्त्व प्राप्त
होतं.
...परस्परसंबंधांत
दुःख-क्लेश अपरिहार्य असतात - रोजच्या जगण्यात आढळतंच आपल्याला ते.
नात्यात तणाव नसेल तर ते नातं रहातच नाही - केवळ एक गुबगुबीत, मऊशार
तंद्रावस्था होऊन जाते ती; अफूची गोळी होऊन जाते. बहुतांश लोकांना हेच
रुचतं, हवंसं वाटतं. आरामदायकतेचा हव्यास आणि तथ्य या दोहोंमधे खरा संघर्ष
असतो; भ्रम व वास्तव यांमधे संघर्ष असतो. भ्रमाची जाणीव झाली, तर आपण तो
बाजूला सारून प्रत्यक्ष नात्याकडे लक्ष देऊ शकू; नातं आकळून घेऊ शकू. मात्र
नात्यात सुरक्षितता शोधत असू, तर आरामदायकतेत, भ्रमजालात मोठी गुंतवणूक
केलेली असते आपण.
असुरक्षितता
हाच नातेसंबंधाचा महिमा असतो, वैभव असतं. ...आपल्या सकळ अस्तित्वाची दशा
प्रकट करणं, उलगडून दाखवणं हेच निःसंशयपणे संबंधित्वाचं कार्य असतं.
स्वतःला उलगडण्याची, आत्मज्ञानाची प्रक्रिया असते ती. स्वतःची ही उकल
वेदनादायी असते.
...नात्यात सुरक्षा हुडकत असाल, तर तुम्ही त्याच्या नैसर्गिक कार्यात खोडा घालताय. यातून पुन्हा स्वतंत्र भानगडी, विपदा ओढवतात.
(From J. Krishnamurti's journal entries during the Wold War II years)
H. said he found relationship most trying and conflicting; it began with a certain joyousness, but soon there crept into it dissension and pain. He asked how he was to get out of this conflict.
To be is to be related, and all relationship is painful. It is the very nature of relationship to cause disturbance. You can mentally formulate a pattern of ideal relationship, but that is only escaping from the factual. Such an intellectual ideal prevents adjustment and the possibility of going beyond conflict. Then pattern becomes more important than understanding.
...Relationship is inevitably painful, which is shown in our everyday existence. If in relationship there is no tension, it ceases to be relationship and becomes merely a comfortable, sleepy state, an opiate, which most people want and prefer. Conflict is between this craving for comfort and what is factual, between illusion and actuality. If you recognize the illusion, then you can, by putting it aside, give your attention to the understanding of relationship. If you seek security in relationship, then it is an investment in comfort, in illusion, and the greatness of relation-ship is its very insecurity. ...Surely, the function of relationship is to reveal the state of one’s whole being. Relationship is a process of self-revelation, of self-knowledge. This self-revelation is painful.
...If you seek security in relationship, you are hindering its function, which brings its own actions and misfortunes.
Comments
Post a Comment