पशू असण्यात गैर ते काय?
* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. * प्रश्न : ओशो, तू म्हणालास, की स्वीकारातून परिवर्तन घडतं. पण मी जेव्हा आपल्या इंद्रियांचा, कामना, वासनांचा स्वीकार करतो तेव्हा परिवर्तित वाटण्याऐवजी मला पशुवत् (animal-like) वाटतं - का बरं असं? ओशो रजनीश: तेच तुझं परिवर्तन आहे. तेच तुझं वास्तव आहे. पशू असण्यात वाईट ते काय? पशुत्वात कमीपणा कसला? खऱ्या अर्थाने 'प्राणी' म्हणवण्यालायक मानव अत्यंत दुर्मिळ होत चाललेत या जगात. डी. टी. सुझुकी म्हणायचा, 'माणसापेक्षा बेडकाप्रती मला जास्त जिव्हाळा आहे, जास्त आदर आहे. तळ्याकाठी बसलेला बेडूक पहा कसा स्तब्ध, शांत असतो. ध्यानाचा अभ्यास न करता, प्रयत्न न करता, आव न आणता ध्यानस्थ होतो बेडूक. त्याला भवतालाचा त्रास होत नाही, त्याच्या ध्यानात कशानेच व्यत्यय येत नाही. ...बसून राहतो तासन् तास, सकळ अस्तित्वाशी तादात्म्य पावतो.' 'अबोध होतो तेव्हा माणूस होतो, बोधाच्या क्षणापासून (enlightenment) मी मांजर झालो,' असं म्हणायचा सुझुकी. पहा एखाद्या मांजराकडे, निरीक्षण करा. निवांत असतं ते. शिथिलतेचं, ...