Posts

सोनसळ

Image
जपानच्या राजानं एका झेन गुरुंकडून बागकामाचे धडे घेतले. तीन वर्षं उलटल्यावर झेन गुरु म्हणाले, "शिकवायचं ते सारं शिकवून झालं आहे. केव्हातरी मी तुझ्या बागेला आकस्मिक भेट देईन. तुझ्या विद्येचंं, कौशल्याचं परीक्षण करेन."  त्यांनी राजाचा निरोप घेतला.   राजा आपल्या शाही बागेची अधिकच निगुतीनं काळजी घेऊ लागला. कोणता दिवस परीक्षेचा ठरेल कुणी सांगावं! बगिचा नेहेमी साफसूफ, नीटनेटका ठेवला जात असे. अनेक माळ्यांना हाताखाली घेऊन राजा बागेवर मेहनत घेत राहिला, त्या दिवसाची वाट पहात राहिला. अखेर एके दिवशी झेन गुरु राजाची बाग पाहण्याकरता आले. राजाला फार आनंद झाला. गुुरु शांतपणे बागेतून फेरफटका मारू लागले. राजा मूक उत्कंठेनं त्यांच्या मागे चालत राहिला. गुरुंच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता नाहीशी होतेय असं त्याला वाटू लागलं. 'आपल्या हातून काही चूक घडली की काय? कुठे बरं कमी पडलो आपण?'    न रहावून राजानं मौनभंग केला: "काय झालं? आपल्या शिष्यानं बागेवर प्रचंड कष्ट घेतल्याचं पाहून आपल्याला आनंद झाल्याचं दिसत नाही. काही चुकलं का आमचं?"   "बाकी सर्व छान आहे, पण सोनसळी पानं ...

एक चिनी शेतकरी

Image
कोण्या एके काळी चीन देशात एक शेतकरी होता. एकदा त्याच्या तबेल्यातील एक घोडा पळून गेला. बातमी पसरताच त्या संध्याकाळी काही गावकरी शेतकऱ्याच्या घरी जमले. "च्च च्च च्च... तुझा घोडा पळाला ना.. फार वाईट झालं." शेतकरी म्हणाला, "हो, कदाचित."   दुसरे दिवशी घोडा परत आला. त्यानं आपल्याबरोबर आपले सात रानटी भाईबंद आणले.  तिन्हीसांजेला गावकरी मंडळी नेहेमीप्रमाणे शेतकऱ्याच्या ओसरीवर जमली. "काय शिकंदर नशीब आहे! सात घोडे आयते घावले की तुला! झ्याक झालं." शेतकरी म्हणाला, "हो, बहुतेक."   तिसरा दिवस उजाडताच शेतकऱ्याच्या मुलाने रानटी घोड्यांना माणसाळवण्याचं काम हाती घेतलं. पैकी एका घोड्यावर स्वार होऊन रपेट करू लागला. घोड्यानं मुलाला आपल्या पाठीवरून उडवून लावलं. मुलाचा पाय मोडला.  शिळोप्याच्या गप्पा करताना मंडळी हळहळली. "बाप रे! नसती पीडा झाली च्यामायला त्या घोड्यांपायी, काय हो?" "हो, बहुधा," शेतकरी म्हणाला.   दरम्यान त्या प्रदेशातील राजकीय परिस्थिती पालटत होती. पुढल्या दिवशी रंगरूट (recruitment) अधिकारी गावात आले. सर्व धडधाडकट पुरुषांना सक्...

एक ते चार

  || १ ||  काही प्रवास विसरता येण्याजोगे नसतात लहानशा मनातही लंबूटांग आठवणी मावतात. लाल बस हेलकावणारी काळपट हिरव्या रस्त्याने पिवळ्या झोतात चमकणारी झाडांची हाडे-पाने चंद्र वाटोळा हासत होता, सारंकाही ठावूक असल्यासारखा. मांजरपिलागत पेंगुळलेली सीटच्या मी कोपऱ्यात उगवले कुठूनसे निळसर काळे दोन हात जड कडवट श्वासांची, दहा बोटांची रात्र सळसळली अंगावरून चंद्र गाऊ लागला एका पायावर, पुलाच्या कठड्यावरून भुऱ्या आकाशात एकही ढग नव्हता. बालिश आढेवेढे सैलावत गेले विसरले नियम आईनं खालच्या आवाजात सुनावलेले - खेळता खेळता एकटीला बाजूस ओढून काहीबाही तिनं बडबडलेलं, मला मुळी नव्हतंच आवडलेलं. मी शेजारच्या दिशेनंं डोळा उघडला ती शालीखाली घोरत होती. थांबून थांबून गायला तो राकट पंजेदार आवाज आणि गाडीचा खडखडाट.  झोपेस्तो ऐकलेल्या त्या गाण्यानं चोरून झोपेत शिरणं शब्द न-कळलेले तरी चाल मनात भिनणं का बरं आवडत नाही पुष्कळांना सारंकाही ठावूक असल्यागत हसणं? || २ ||  - पण 'तिनं' ते पुरतं हेरलं होतं कॉलेजच्या लहानशा गच्चीत तिला फुलपाखरू सापडलं होतं थेंबभर प्राणांसाठी तिनं त्या ...

मुलांविषयी तुम्हाला खरी तळमळ असेल, तर उद्याच्या उद्या जगात क्रांती घडून येईल

Image
तुम्ही मुलांना जन्म का देता? - चुकून, अपघाताने, अनिच्छेने? नकोशी घटना असते का ती? तुमच्या घराण्याचं नाव, तुम्हाला मिळालेले खिताब, उपाध्या, वडिलोपार्जित संपत्ती पुढे चालवणारं कुणीतरी हवं म्हणून मूल पैदा करता का तुम्ही? नेमकं काय डोक्यात असतं तुमच्या?? ज्याच्याशी खेळून, हासून, बोलून दोन घटका विरंगुळा होईल असं खेळणं म्हणून मूल जन्माला घालता? की एकटं वाटतं तुम्हाला, त्या एकटेपणावर पांघरूण घालण्यासाठी मुलाच्या संगोपनात गुंतायचं असतं?  कशाला इतकी पोरं पैदा करता तुम्ही, त्यांचं संगोपन कसं करावं याची अक्कल नसताना? ...मुलांविषयी तुम्हाला खरी तळमळ असेल ना, तर उद्याच्या उद्या जगात क्रांती घडून येईल.   आपल्या मुलांवर जर तुमचं प्रेम असेल; तुमच्यामते जर ती ‘गोंडस खेळणी’ नसतील - दोन घटका मन रमवणारी व नंतर वैताग आणणारी खेळणी नसतील - तर मुलं काय खातात, कुठे निजतात, दिवसभर काय करतात; त्यांना मार पडतोय का, त्यांची मनं कुस्करली जाताहेत का, त्यांचं व्यक्तित्व ठेचून टाकलं जातंय का, हे जाणून घ्यावंसं नाही वाटणार तुम्हाला?? पण ते जाणून घ्यायचं म्हणजे चिकित्सा केली पाहिजे; मूल आपलं असो वा शेजाऱ...

दीना!

Image
मास्टर दीनानाथ मंगेशकरांबद्दल काही लेख वाचनात आले. भारतीय शास्त्रीय संगीताचा माझा अभ्यास नाही, तितकीशी ओढही नाही. मात्र का कोण जाणे, संगीत-नाट्य क्षेत्रातील मंडळींनी या कलाकाराबद्दल वर्णलेल्या काही आठवणी इतरांशी वाटून घेण्याची इच्छा होतेय:     संगीतातील रुचिपूर्ण, उत्तम काहीही शिकण्याबद्दल मास्टर मुक्तग्राही होते. विद्वान लोकांकडून त्यांनी चिजांचा मोठा संग्रह केला. उत्तरेकडील, थोडे दक्षिणेकडील गायकीचे ढंग आत्मसात केले. ...गोव्यातील मडकइ ते वाफर या तासा-दीड तासाच्या पायी प्रवासात विलक्षण बुद्धिमत्तेच्या मास्टरांनी आपले गुरू बाबा माशेलकर यांजकडून अकरा चिजा शिकून घेतल्या, असा प्रसंग ऐकीवात आहे!  फार फार आत्मीयतेनं त्यांनी हे भांडार मिळवलं, व मुक्तहस्ते शिष्यांना देऊ केलं. मास्टरांची शिकवण्याची ठराविक पद्धत नव्हती. मनात येईल तसे, हिशोबीपणा न करता शिकवत. प्रभाकर जठारांना भरभरून बंदिशी देतेेवेळी ते म्हणाले: "एकच राग सहा-सहा महिने शिकवायचा माझा स्वभाव नाही. शे-दोनशे बंदिशी गळ्यातून गेल्या म्हणजे तुझा आवाज आपोआप निकोप होईल. एकदा शिकवून झाल्यानंतर गाणं हे ज्याच्या-त...

न संपणाऱ्या रात्रीवर निघताना

शाई, कागद, पेनाच्या ठरीव जागांची आठवण एक चेहरा नव्याकोऱ्या मैत्रिणीचा आणखी एक धूतवस्त्रात गुंडाळलेला तासांच्या गळ्यातील घोगऱ्या घंटा पुस्तकांवरली धूळ माळ्यातली वळवळ, परसातल्या फुलांचा दरवळ नि ती आपण फुलवल्याचा टिचभर अहंकार बुडवूनही न मरणारी, स्वप्नांवर तरणारी वासना आणि 'शाल' म्हणा, वा 'खाल' म्हणा साफ एकटेपणाची: न संपणाऱ्या रात्रीवर निघताना सोबत घेता येतं जेमतेम एवढंच.   - मुक्ता 'असरार' © मुक्ता असनीकर

स्वप्न

मी, जॉर्ज ऑर्वेल आणि टी. एस. एलियट एका मोठ्या खाटेवर एकमेकांशेजारी पहुडलो होतो. जाड रजईतसुद्धा थंडी वाजत होती.  ही खाट नेमकी कुठे असावी? वर खुलं आकाश होतं, भवती अंधार. वाळवंटात होतो आम्ही बहुधा. इतरांना विचारण्याची, स्वतः उठून जाणून घेण्याची इच्छा होत नव्हती. माझ्या पाठीमागं ऑर्वेल आणि एलियट एकमेकांकडे तोंड करून बोलत होते. खाटेच्या टोकाला पाय छतीशी मुडपून, शाल लपेटून बसलेल्या आमच्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांशी मी गप्पा मारत होतो. सारे धीम्या आवाजात बोलत होतो.   काहीवेळाने मागून येणारा आवाज बंद झाला. दोघे झोपी गेले असावेत. बऱ्याच वेळाने ऑर्वेल म्हणाले, "जरा इकडे बघ." मी मागे वळून पाहिलं. ऑर्वेल एलियटकडे एकटक पाहत होते. त्यांनी माझा हात हातात घेऊन एलियटच्या मनगटाला लावला - नाडी बंद पडली होती.   मग मी व ऑर्वेल शांत झोपी गेलो. डोळे मिटण्यापूर्वी मी खाटेच्या टोकाकडे नजर टाकली - गुढघ्यांवर हनुवटी टेकवून आमचे प्राध्यापक विचारांत पार गढले होते.

शब्द मोठे की सूर?

Image
  वोल्फगाङ्ग आमाडेउस मोत्सार्टची ( Mozart ) प्रतिभा आपल्याला मोहून टाकते, भारून टाकते. त्यानं ज्यांसोबत  काम केलं ते लिब्रेटिस्ट्स (ओपेरालेखक - संहिता, गद्य/पद् य लिहिणारे) देखील आपल्या कामात तोडीस तोड होते बरं. कुठेसा वाचलेला हा प्रसंग अगदी ठळकपणे लक्षात राहिलाय. विस्मरण्यापूर्वी सांगते:   'सूर सर्वश्रेष्ठ, सुरांचं महात्म्य निर्विवाद आहे' असं मोत्सार्टचं पालुपद चालू असायचं. एका लिब्रेटिस्टनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, "अरे, सूर आणि शब्द परस्परपूरक नसतात का? दोहोंपैकी एक जरी नसेल तर ओपेरा उभाच राहणार नाही."    पण मोत्सार्टचं आपलं तेच.   तेव्हा लिब्रेटिस्ट म्हणाला, "ठीक आहे. यापुढे रद्दी कागद, वाणसामानाच्या याद्या वगैरेंतल्या शब्दांना संगीत दे, तेच गाऊन घे रंगमंचावर. फक्त सूरच श्रेष्ठ असतील, तर त्यांच्या मखरात वाट्टेल ते शब्द बसवा, खपतीलच की. शिवाय माझ्यासारख्या लेखकबिखकांच्या मानधनावर खर्च होणारे पैसे वाचतील." तेव्हा कुठे मोत्सार्टच्या डोक्यात प्रकाश पडला!

दुर्गाबाई उलगडतात पशुपक्षी व पाकशास्त्राचं नातं...

...दोन प्राण्यांनी माणसाच्या पाकज्ञानात भर घातली आहे: अस्वल व माकड.  दक्षिणेकडे अस्वलं मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे अस्वल शाकाहारी असतं. त्याचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं. वसंतात झाडांना फुलं धरली, की अस्वलं हरतऱ्हेची सुवासिक फुलं गोळा करतात. मधाची पोळीदेखील उतरवतात. ही पोळी व फुलं एकत्र करून पायाने वा काठीने तुडवतात. या काल्याला 'अस्वलाचं पंचामृत' म्हटलं जातं. ते अत्यंत पौष्टिक असतं. माणसालाही ते आवडतं, व ते हस्तगत करण्यासाठी अस्वलांची शिकार केली जाते. अस्वलाने शिकवलेला हा पदार्थ मी (घरी) करून पाहिला. बरीच वासाची फुलं व खूपसा मध घालून मी ते केलं. काहीजण कृत्रिम चवींना इतके सवकलेले असतात, की त्यांना हा पदार्थ रुचला नाही. मी मात्र तो आवडीने खाल्ला.   माकडाकडून मानवजातीला मिळालेला अपूर्व पदार्थ म्हणजे बाळंतिणीचा डिंकाचा लाडू! ..आम्ही जंगलात होतो तेव्हा पाहिलं, की मादी माकड बाळंत झाल्यावर नर माकड जंगलात डिंक व मध गोळा करतं, त्याचे ओबडधोबड लाडू वळून ते मादीला खाऊ घालतं. उत्तर प्रदेशात गंगा-यमुनेच्या काठची माकडं चारोळ्या गोळा करून, डिंक व मधात त्या घोळून लाडू बनवतात. अर्था...

'प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाकातले काही ना काही अजब कौशल्य प्राप्त असते' - दुर्गा भागवत

...आमच्याकडे स्वयंपाकाला एक बाई होत्या. त्यांची आई लहानपणीच वारली, एका इस्पितळात आश्रित म्हणून वाढल्या. रूपाने देखण्या परंतु अस्थिर बुद्धीच्या असल्यामुळे पुढे नवऱ्याने त्यांना टाकले. मग त्या माझ्या आत्याच्या घरी नोकरीला राहिल्या.   या बाईंचे सारे काम दिव्य असे. उत्तराला प्रत्युत्तर ठरलेलं. मोदक अतिशय सुरेख करायच्या. मी मोदक त्यांच्याकडून शिकले. पीठ दळण्यापासून सारे त्या करायच्या. बारीक पिठी दळण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. एकावर एक तीन मोदक कसे करायचे ते त्यांनी मला शिकवलं: एक बरीच मोठी पारी करायची. पहिल्यांदा सर्वात खालच्या मोदकाचे कंगोरे काढायचे, सारण भरून तो मिटवताना बरंचसं पीठ वर येतं. त्या पिठाचा पहिल्यापेक्षा लहान मोदक करायचा. उरलेल्या पिठाचा तसाच वर तिसरा मोदक करायचा. तीन-तीन मोदकांच्या अशा चार उतरंडी करून गणपतीच्या मखराच्या चारी बाजूंना मांडायच्या. हे कसब मी पहिल्यांदा त्यांच्याकडे पाहिलं, आणि माझ्या कुवतीप्रमाणे हस्तगतही केलं.  प्रत्येक व्यक्तीला, बाई असो वा बुवा, स्वयंपाकातले काही ना काही अजब कौशल्य प्राप्त असते अशी माझी समजूत तेव्हापासून झाली आहे.