अश्रू
तुमच्यापाशी असलेल्या कित्येक देखण्या गोष्टींहून तुमचे अश्रू अत्यधिक सुंदर असतात, कारण अस्तित्व ओतप्रोत भरून वाहतं तेव्हा अश्रू ओघळतात.
अश्रू नेहेमी दु:खाचेच असले पाहिजेत असं नव्हे; कधी ते अतीव सुखातून येतात, कधी तर अतीव शांतीतून येतात, कधी प्रेमातून निर्माण होतात. खरंतर अश्रूंचा सुखदु:खाशी फारसा संबंध नाही. जेव्हा तुमच्या हृदयाला काहीतरी आतपासून हेलावून टाकतं, तुमचा ताबा घेतं, जेव्हा ते तुम्ही सामावून घेऊ शकाल त्याहून खूप जास्त असतं, तेव्हा ते काठोकाठ भरून वाहू लागतं, म्हणजेच अश्रू पाझरू लागतात.
अश्रू स्वीकारा, त्यांचा आस्वाद घ्या, त्यांचं स्वागत करा. अश्रूंच्या माध्यमातून तुम्हाला प्रार्थना उमगेल. पहावं कसं, हे तुम्हाला अश्रूंद्वारे कळेल. अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांत सत्य पाहण्याची क्षमता असते. अश्रूभरल्या डोळ्यांत जीवनाचं सौंदर्य पाहण्याची, त्यातलं वरदान जाणून घेण्याची शक्ती असते.
- रजनीश (ओशो)
Comments
Post a Comment