आध्यात्मिक समतोल
आध्यात्मिक, आतल्या प्रवासाला निघालेली, स्वतःच्य अंतरंगाकडे वळलेली व्यक्ती काहीशा विचित्र समतोलात जगते.
जे मिळालंय त्यात समाधानी असली तरी ती असंतुष्टतेची भावना बाळगते. हे विसंगत वाटेल. माणूस एकतर समाधानी असेल, नाहीतर असमाधानी असेल असं आपल्याला वाटतं. पण आध्यात्मिक व्यक्ती दोन्ही असते. आयुष्याने जे दिलं आहे त्यात ती समाधानी असते पण ‘त्यापलिकडे आणखी खूप काही आहे’ ही जाणीव असल्याने ती आत्मसंतुष्ट होत नाही. तिची तहान जागी असते म्हणूनच तिला क्षणा-क्षणाला काही नवीन गवसत राहतं.
- रजनीश (ओशो)
Comments
Post a Comment