अवलंबिता की मुक्तेच्छा?
जगात दोन प्रकारच्या विचारधारा अस्तित्वात आहेत. एक म्हणते, स्वतःच्या इच्छेनुसार, संकल्पानुसार वाट्टेल ते करण्याचं स्वातंत्र्य – free will - माणसाला लाभलं आहे. ही कल्पना मुळातच असत्य असल्याने तीविरोधात युक्तिवाद होऊ शकतो, तसा तो केलाही जातो अन् मग पूर्णतः विरोधी भूमिका घेतली जाते, जी म्हणजे ‘ कोणीही स्वतंत्र नाही. आपण कळसूत्री बाहुल्या आहोत, आपली सूत्रं अज्ञाताच्या हातात आहेत. आपण तर केवळ गुलाम आहोत’.
दोन्ही विचारधारा असत्य आहेत. आपण गुलाम नसतो व स्वतंत्रदेखील नसतो. ...समजून घ्यायला जरा कठीण आहे. कारण आपण ‘आपण’ नसतोच, मी केवळ ‘मी’ नसतो, तर पूर्णत्वाचा (wholeness) एक अंश असतो. तुम्ही स्वत:ला पूर्णत्वापासून तोडू पहाल, पृथक करू पहाल, तर तुम्ही व सृष्टी यांमध्ये संघर्ष निर्माण होईल; तुम्हाला कशाच्यातरी आधीन असल्यासारखं वाटेल, एकाकी, असहाय वाटेल. तुम्ही स्वत:ला पूर्णत्वाचा एक भाग म्हणून समजून घेतलंत तर तुम्ही स्वामी असाल, मात्र पूर्णत्वा‘सह’ स्वामी - पूर्णत्वा‘चे’ स्वामी नव्हे.
मुक्तेच्छा, संकल्पशक्ती (free will) असं काही नसतं, आणि प्राक्तन (fate) असंही काही नसतं. अवलंबिता, स्वातंत्र्य - दोन्ही शब्द खोटे आहेत. खरं आहे हे ते परस्परावलंबित्व. मी तुझ्यात आहे, तू माझ्यात आहेस. आपलं अस्तित्व एकमेकांत गुंफलेलं आहे. जो श्वास एका क्षणापूर्वी माझ्यात होता, तोच आता तुझ्यात गेला आहे. एका क्षणापूर्वी मी कदाचित ‘हा माझा श्वास’ असं म्हणू शकलो असतो, पण आता कुठाय तो? आज जे काही रक्त म्हणून तुझ्या शरीरात वाहतंय ते अगदी अलिकडपर्यंत एखाद्या झाडात रस म्हणून वाहत होतं. त्याचं फळ झालं, तू ते खाल्लंस, आता ते तुझ्या शरीरात वाहतंय. एकेदिवशी तू देह ठेवशील - मातीत मिसळून जाशील, जावंस. त्या मातीतून अंकुर फुटेल; तू त्याचं खत होशील. एक झाड वाढेल, त्याला फळं लागतील, तुझे वंशज ती खातील. तूसुद्धा याचप्रमाणं आपल्या आजे-पणज्यांना स्वतःत घेतलं आहेस.
हे चालतच रहातं निरंतर! समस्त भूतकाळ वर्तमानाकडून ग्रहण केला जातो. समस्त वर्तमान भविष्याच्या पोटात लुप्त होतो. सारंकाही एकमेकाशी बांधलेलं आहे - जाळ्याच्या धाग्यांप्रमाणे. तू कुणीच नाहीस, दोन धागे एकमेकाला छेदतात तो बिंदू असशील फार तर फार.
या गोष्टी स्वच्छ उमजल्या तर तुम्हाला हसू येईल, मनापासून हसाल तुम्ही!

- रजनीश (ओशो)
Comments
Post a Comment