Posts

Showing posts from July, 2025

अलेक्झांडर व डायॉजिनिस

Image
सम्राट अलेक्झांडर विश्व पादाक्रांत करण्यासाठी निघाला. वाटेत त्याला डायॉजिनिस दिसला. हा ग्रीक तत्त्वज्ञ म्हणजे एक वल्लीच होती. अलेक्झांडरला त्याच्याविषयी कुतुहल वाटे. "आजचा दिवस विश्राम करा," तो सैन्याला उद्देशून म्हणाला, "आपण इथेच तळ ठोकतोय. मी डायॉजिनिसकडे जाणार आहे. अनेक वर्षांपासून त्याला पाहण्याची इच्छा होती, कदाचित आज पुरी होईल. येथपासून जवळच कुठेतरी तो मुक्कामाला आहे असं दिसतं. त्याची भेट घ्यायला फार आवडेल मला."   अलेक्झांडर डायॉजिनिसचा पत्ता शोधत निघाला. सकाळची वेळ होती. स्वारी नदीकिनारी ऊन खात पडली होती. फकीरवृत्तीचा डायॉजिनिस नग्नावस्थेत रहायचा म्हणतात. ...वाळूत पहुडलेल्या त्या नंग्या शरीराचं आगळंच तेज होतं. आगळंच रुपडं होतं ते. अखंड तृप्ती झळकत होती त्या देहावर. एक महान सम्राट 'वेडा' म्हणवल्या जाणाऱ्या एका भणंग इसमाचं जगावेगळं सौंदर्य न्याहाळू लागला.    अलेक्झांडर म्हणाला, "तुला पाहून मन प्रसन्न झालं. तुझ्यासाठी करण्याजोगं काही असेल, तुला देण्यायोग्य माझ्यापाशी काही असेल तर अगदी आनंदानं देईन मी."   "तू जे देशील त्याची मला...

मदहोशी

Image
    एके संध्याकाळी अकबर जंगलात शिकारीसाठी गेला होता. नमाज़पठणाची वेळ झाल्याचं परतीच्या वाटेवर त्याच्या लक्षात आलं. घोड्यावरून खाली उतरून, पालापाचोळ्यात सतरंजी अंथरून तो नमाज़ अदा करू लागला. एकाएकी अकबराच्या अंगाला कसलासा धक्का लागला. बेसावध अकबर वज्रासनातून जवळपास कोलमडलाच. नीट पाहीपर्यंत वेगाने धावत जाणारी मानवी आकृती जंगलात गुडूप झाली होती. अकबराच्या मनात त्या अज्ञात व्यक्तीला शासन घडवण्याची इच्छा उफाळून आली. पण करता काय, नमाज़ पढत असता मध्येच उठून चालत नाही. नमाज़पठणानंतर अकबर तिथेच खोळंबून राहिला. ...कदाचित तो इसम गेल्या वाटेने परत येईल.  तो पहा आला! अल्लड युवती होती ती.   "ए मुली! थांब जरा," तिची वाट अडवत अकबर गुश्शात म्हणाला. "नमाज़ अदा करणाऱ्या माणसाला तुझा धक्का लागला, तरी तू तशीच पुढे पळून गेलीस. माफी मागणं सोडा, मागे वळून बघितलंदेखील नाहीस. अगं, तुला काही रीतभात? नमाज़पठण करणारी व्यक्ती खुद्द सम्राट अकबर आहेत, हेही तुझ्या लक्षात येऊ नये म्हणजे हद्द झाली! सोम्यागोम्यालाही प्रार्थनेचे वेळी त्रास देऊ नये, तू चक्क सम्राटाला धक्का दिलास. लाज नाही वाट...

प्रेमाचा नाच, भक्तीचं गूढ

Image
ज्यांना आपण ‘गूढवादी’ (mystic) म्हणतो अशा व्यक्तींची चरित्रं पाहाल, तर त्यांत पुरेपूर वैविध्य, वैचित्र्य आढळेल. कोणी नजरेसमोर आले तरी पत्ताच लागू नये इतके सर्वसामान्य दिसतात, कळकट-मळकट रहातात. तर कोणी इतके तेजःपुंज, की वाटेवरल्या आंधळ्याचाही आत्मा क्षणिक उजळून जावा!  अंतर्बाह्य शहाण्या व्यक्तींच्या जगण्या-वागण्याचा कोणताही ठराविक ढंग नसतो, निश्चित चाकोरी नसते. कुणीही इतरांचं अनुकरण करत नाही; आदर्शांचा कित्ता गिरवत नाही.   ‘गूढवादी’ म्हणून ओळखली जाणारी मंडळी ईश्वराचं रूप दोन प्रकारे कल्पतात: सूफीपंथीय ईश्वराला प्रेयसी मानतात. त्यांच्यालेखी ती स्त्री असते. जगात ही एकमेव स्त्री असते, व सारीच माणसं ‘ति’चे ‘तो’ असतात. भारतातील गूढवाद्यांत ईश्वर हा प्रियकर असतो. जगात हा एकमेव पुरुष असतो, व बाकी सारे ‘त्या’च्या ‘ती’ असतात.  ... मीरा बावरी नाचत-गात मथुरेस पहोचली - कृष्णाच्या भव्य, प्रासादतुल्य मंदिरापाशी. त्याकाळी या कृष्णमंदिरात स्त्रियांना प्रवेश नव्हता! …कृष्णाच्या मंदिरात स्त्रियांना बंदी?? किती हा मूर्खपणा! पण आपल्यापैकी बहुतेकजण निरर्थक रुढींचं, फडतूस नीतिनि...

देवाची हाडं

एके रात्री कडाक्याच्या थंडीत एक साधू एका मंदिरात मुक्कामास आला. ऊबेसाठी त्यानं चक्क देवाची लाकडी मूर्ती पेटवली! तडतड आवाजानं पुजारी जागा झाला. बघतो तर काय, देवाची मूर्ती जळतेय!    ते दृष्य पाहून पुजारी स्तंभित झाला. मनात क्रोधाचा आगडोंब उसळला, पण तोंडून शब्द फुटेना. त्याचवेळी त्याला दिसलं, की साधू मूर्तीची राख चाचपडतोय.  अखेर त्यानं घुश्शात विचारलं, "देवाची मूर्ती जाळलीस, आता हे काय चालवलंयस?"  "देवाची हाडं शोधतोय," साधू उत्तरला.   "मूर्खा, लाकडात हाडं कुठून येणार?"  "असं का? मग कृपा करून आणखी एक मूर्ती आणा. भलताच गारठा आहे, शिवाय रात्रही पुष्कळ बाकी आहे." साधू म्हणाला.

'स्वानंदाद्वारे मी परमानंद जाणतो'

Image
च्वांग त्झू  आणि हुइ शी हाओ नदीच्या काठाने चालले होते.    च्वांग त्झू  म्हणाला, "मासोळ्या बघ पाण्यात कशा खेळतायत, सूर मारतायत. यातच त्यांना आनंद आहे."   "तुम्ही स्वतः मासा नाही, मग माशांना कशात आनंद आहे ते तुम्हाला कसं ठावूक?" - हुइ शी चा प्रश्न. "तू म्हणजे मी नाहीस, मग माशांचा आनंद मला ठावूक नाही, हे तुला रे कसं ठावूक?" - च्वांग त्झू. "बरोब्बर! मी म्हणजे तुम्ही नसल्यामुळे तुम्हाला ते ठावूक आहे की नाही हे जसं मला कळू शकत नाही, तस्संच तुम्ही म्हणजे ती मासोळी नसल्यामुळे तिच्या भावनासुद्धा तुम्हाला कळू शकत नाहीत - मुद्दा स्पष्ट आहे!" - हुइ शी. "आं, जरा थांब," च्वांग त्झू म्हणाला, "आपण तुझ्या मूळ प्रश्नाकडे परत फिरू. तू विचारलंस, 'माशांना कशात आनंद आहे ते तुम्हाला कसं ठावूक?' म्हणजे मासे आनंदात असल्याचं मला ठावूक आहे, इतकं तुला समजलं होतं. 'कसं काय?' हा खरा प्रश्न होता. नदीतल्या मासोळ्यांचा आनंद मी जाणतो, कारण त्याच नदीकाठाने चालत असता स्वतःला होणारा आनंद मी जाणतो. स्वानंदाद्वारे मी परमानंद जाणतो."       

बुद्ध, कन्फ्यूशिअस व लाओ-त्सू चहाला भेटतात...

Image
बुद्ध, कन्फ्यूशिअस व लाओ-त्सू एकमेकांचे समकालीन. चीनमधील चहापानाच्या दुकानात एकदा तिघांची भेट झाली म्हणे. गप्पाटप्पा सुरु होत्या. दुकानमालकानं ओळखलं तिघांना. त्यांच्या बैठकीपाशी येऊन तो म्हणाला, "आपण आमचे खास पाहुणे. आपणा तिघांना इथं पाहून झालेल्या आनंदाप्रित्यर्थ मी एक खास पेय पेश करतो. ..'जीवनरस' म्हणतो आम्ही याला". हातांतली किटली त्यानं तिघांपुढे तिपाई मेजावर ठेवली.    बुद्धानं सुहास्यवदनाने किटलीवरील कलाकुसर न्याहाळली, व दुकानदारास शांतपणे म्हणाला, "धन्यवाद. परंतु जीवन म्हणजे साक्षात् दुःख. दुःखमुक्ती हे माझ्या शिकवणीचं सार असताना मी हा रस कशाला चाखू!" कन्फ्यूशिअसनं त्या सुरेख किटलीचं झाकण अलगद उघडलं. तो म्हणाला, "एकही थेंब चाखून न पाहता अशी भेट नाकारणं बरोबर नव्हे." त्यानं अगदी थोडं पेय कपात ओतून घोट घेतला. पेय घशाखाली जाताच त्याचा चेहरा कसनुसा झाला. "बुद्धा, खरंय तुझं म्हणणं," कन्फ्यूशिअस म्हणाला, जीवनरस उग्र आहे, कटु आहे. पिऊन जाम हैराण होतो माणूस. यात काही अर्थ नाही".    लाओ-त्सूची पाळी येता त्यानंही किटलीची क...

'असरार' - मेरा तख़ल्लुस

  असरार =   (ब्रज भाषा) (क्रि.वि.)   निरंतर, लगातार, बराबर (अरबी,उर्दू)  (पु.) १. भेद, राज़, मर्म {'सिर' / 'सिर्र' का बहुवचन} २. भूत, प्रेतात्मा

Soul status in the Harry Potter universe

Image
    This academic paper was written in the year 2013       © Mukta Asnikar The object of this essay is to survey the ontological 1 and moral status given to (the concept of) soul in the Harry Potter series by collating it with some of the soul theories we touch upon in our academic syllabi.   Before diving into the discourse on soul, let’s revise a few indispensable facts about J. K. Rowling’s fabric: There are, as I call them, modes of relations operating in the world - physical (Physics), biological, psychological, sociological and so on. All our interactions with ourselves and the world are founded on, materialized through and controlled by these natural or anthropic forces.  A fundamental feature of Harry Potter universe is the mode of relation called Magic . The conception of this numinous force allows the author to transmute various themes, problems, personal experiences, and expand Pottrerverse to her fancy.    One is/ isn’t en...