वास्तवात आपण कोणीही नसतो
एका शास्त्रज्ञानं म्हणे आपल्या आत्मवृत्तात पुढील प्रसंग वर्णिला आहे:
शास्त्रज्ञ आत्मवृत्तात लिहितो: 'मित्राच्या त्या आवाहनानं आम्हा सर्वांना बुचकळ्यात टाकलं. काय करावं? कसं भेटावं एकमेकाला? केवळ माणूस म्हणून एखाद्याला भेटणं म्हणजे काय? 'मी कोण आहे, माझा पेशा काय' वगैरे माहितीची देवाणघेवाण झाली, तर संभाषण घडू लागतं, विषयामागून विषय निघतात. समोरच्या माणसासोबत वेळ घालवता येतो. पण हे नाही करायचं तर मग सुरुवात कुठून करायची? केवळ पुरुषांना, स्त्रियांना, माणसांना भेटणं म्हणजे काय??'
शास्त्रज्ञानं पुढं असं नोंदवलं आहे, की मित्राच्या त्या आवाहनानं बहुतांश पाहुण्यांना अवघडल्यागत झालं. कोणीच एकमेकाशी फारसं बोललं नाही. पुष्कळांनी जेवण आटोपताच काढता पाय घेतला. एखाद्या पार्टीत इतकी शांतता यापूर्वी कुणी कधी अनुभवली नसेल.
...नावं, बिरुदं, उपाध्या, व्याख्या नसतील, तर मन चालतच नाही, कुंठित होऊन जातं. 'मी लेखक आहे, माझं अमुक तमुक प्रकाशित झालंय, सध्या मी अमुक तमुक लिहितोय... मी अमुक ठिकाणी रहातो, मला तमुक आवडतं' वगैरे गोष्टी उगाळल्या नाहीत, तर आपण कोण असतो?
एके संध्याकाळी
शास्त्रज्ञाच्या मित्रानं पार्टी आयोजित केली होती. परिचयातील कित्येक
प्रथितयश व्यक्तींना - शास्त्रज्ञ, वास्तुरचनाकार, कवी, लेखक, शिक्षक,
चित्रकार, संगीतकार, शिल्पकार वगैरे मंडळींना त्यानं पार्टीला बोलावलं
होतं. पाहुणे जमल्यानंतर तो मित्र साऱ्यांच्या मधोमध उभा राहून म्हणाला:
"मित्र हो! आजच्या या पार्टीत मी तुमचा एकमेकांशी परिचय करून देणार नाही, व
तुम्हीदेखील एकमेकांची औपचारिक ओळख करून घेऊ नये अशी तुम्हाला विनंती
करेन. नावांत, बिरुदांत, उपाध्यांत काय आहे! जमलं तर परस्परांना एक माणूस
म्हणून भेटा.
तुम्ही
नावाजलेले डॉक्टर असाल, इंजिनीयर असाल - ते सगळं आज बाजूला सारू या. मी
काही डॉक्टर्स, इंजिनीयर्स, वकिलांची सभा बोलावलेली नाही! मी तर केवळ
मैत्रीच्या नात्यानं, माणसं म्हणून तुम्हाला आमंत्रण दिलंय."
शास्त्रज्ञ आत्मवृत्तात लिहितो: 'मित्राच्या त्या आवाहनानं आम्हा सर्वांना बुचकळ्यात टाकलं. काय करावं? कसं भेटावं एकमेकाला? केवळ माणूस म्हणून एखाद्याला भेटणं म्हणजे काय? 'मी कोण आहे, माझा पेशा काय' वगैरे माहितीची देवाणघेवाण झाली, तर संभाषण घडू लागतं, विषयामागून विषय निघतात. समोरच्या माणसासोबत वेळ घालवता येतो. पण हे नाही करायचं तर मग सुरुवात कुठून करायची? केवळ पुरुषांना, स्त्रियांना, माणसांना भेटणं म्हणजे काय??'
शास्त्रज्ञानं पुढं असं नोंदवलं आहे, की मित्राच्या त्या आवाहनानं बहुतांश पाहुण्यांना अवघडल्यागत झालं. कोणीच एकमेकाशी फारसं बोललं नाही. पुष्कळांनी जेवण आटोपताच काढता पाय घेतला. एखाद्या पार्टीत इतकी शांतता यापूर्वी कुणी कधी अनुभवली नसेल.
...नावं, बिरुदं, उपाध्या, व्याख्या नसतील, तर मन चालतच नाही, कुंठित होऊन जातं. 'मी लेखक आहे, माझं अमुक तमुक प्रकाशित झालंय, सध्या मी अमुक तमुक लिहितोय... मी अमुक ठिकाणी रहातो, मला तमुक आवडतं' वगैरे गोष्टी उगाळल्या नाहीत, तर आपण कोण असतो?
समस्त भूतकाळ, भविष्यकाळ बाजूला सारला, तर चालू क्षणात आपली ओळख काय असते? - आपल्याला मुळी ओळख नसतेच!
वास्तवात आपण कोणीही नसतो.
Comments
Post a Comment