देवाची हाडं
एके
रात्री कडाक्याच्या थंडीत एक साधू एका मंदिरात मुक्कामास आला. ऊबेसाठी त्यानं चक्क देवाची लाकडी मूर्ती पेटवली! तडतड
आवाजानं पुजारी जागा झाला. बघतो तर काय, देवाची मूर्ती जळतेय!
ते
दृष्य पाहून पुजारी स्तंभित झाला. मनात क्रोधाचा आगडोंब उसळला, पण तोंडून शब्द
फुटेना. त्याचवेळी त्याला दिसलं, की साधू मूर्तीची राख चाचपडतोय.
अखेर त्यानं घुश्शात विचारलं, "देवाची मूर्ती जाळलीस, आता हे काय चालवलंयस?"
"देवाची हाडं शोधतोय," साधू उत्तरला.
"मूर्खा, लाकडात हाडं कुठून येणार?"
"असं का? मग कृपा करून आणखी एक मूर्ती आणा. भलताच गारठा आहे, शिवाय रात्रही पुष्कळ बाकी आहे." साधू म्हणाला.
Comments
Post a Comment