Posts

Consent in romance

Consent is part of that honesty in relationship, is it not? And honesty is so superficially understood! But we've build a concept, a defensive wall out of consent now. We've turned it into a guard, and we forget how complex, or simple it could be. Consent is to listen, to respect the other person even in the heat of one's own passion; an understanding of a sort, no? When love is, this happens more or less easily. But we've made consent into a discourse, a big fuss. This way it stinks.   It seems to me that human sexuality in urban times and spaces is getting duller on one hand, and more violent on the other. The damages in relationship are getting quicker, uglier and more irreparable, just like the numerous consumer products we use. Disconnect from nature, from its vast expanses, from its challenges certainly makes us excessively intellect-driven. And intellect alone can't help.  We don't understand what to do with our own animality, how to relate to ourselves...

नखचोखी मुंगी

Image
मी नखं कापून एका जागी रचून ठेवली व काही मिनिटांकरता दुसऱ्या कामात गुंतले. नखं गोळा करू म्हटलं तेव्हा एक मुंगी नखावर चढून काहीतरी करताना (खाताना / चोखताना) दिसली. नखं मोजून पाहते तर दोन तीन कोरी गायब झालेल्या! थोड्या अंतरावर मुंग्यांची रांग भिंतीतल्या फटीत चालली होती. कदाचित त्यांनी नेली असावीत. ही  मुंगी मात्र जरा अधीर असावी, किंवा गर्दी टाळत असावी, कुणास ठावूक! पण ती नक्की काय करत होती? कशासाठी? आपली नखं 'केराटिन' नावाच्या कठीण प्रथिनानं बनलेली असतात. मुंग्यांना हे पचण्यास फार जड. परंतु कापलेल्या नखांतले मृत त्वचेचे अंश, काही प्रकारची बुरशी, (आपण हाताने जेवत असू / स्वयंपाक करत असू तर) अन्नाचे सूक्ष्मांश वा तत्सम जैविक घटक मुंग्यांच्या दृष्टीने खाण्यालायक असतात. त्यामुळे मुंग्यांच्या खाद्य-बेगमीत आपल्या नखांचा समावेश असल्यास आश्चर्य वाटायला नको! पश्चिम गोलार्धात आढळणाऱ्या 'अटिना' उपकुळातील मुंग्या पेशानं शेतकरी, पोषणासाठी बुरशीची लागवड करणाऱ्या.  ही बुरशी केराटिनचं विघटन करू शकते, त्यामुळे या मुंग्या 'बुरशीचा खाऊ' म्हणून मानवी नखं वापरत असाव्यात. भारतातील ...

मॅडम ब्लावात्च्का व प्रेमाच्या बीया

Image
प्रेम देणं, प्रेम करणं हा खरोखर सुंदर अनुभव असतो. तिथे तुम्ही महाराजा, महाधिपती असता. तुमच्यापाशी अमर्याद  खजिना असतो. तुम्ही तो मनसोक्त वाटू शकता. 'केव्हातरी हा खजिना रिता झाला तर!' अशी चिंता मुळीच करू नका. तसं होत नाही. प्रेम हे परिमाण नव्हे, तो भाव आहे, गुण आहे. प्रेमाच्या खजिन्याची अद्भुतता अशी की तो दिल्याने वाढतो, आणि कंजूषपणे स्वतःजवळ राखून ठेवल्याने कुजतो, निकामी होतो. तेव्हा प्रेमाबाबत काटकसर करू नका, उधळखोर व्हा! आपण प्रेमाचा वर्षाव कोणावर करताहोत याची फिकीर करू नका - 'मी विशिष्ट लोकांवरच प्रेम करेन' हा विचार कोत्या मनाचं लक्षण असतं. 'कुणी मागितलं तर मी देईन' म्हणून खोळंबून राहू नका - प्रेम द्या! देत रहा! थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापिका मॅडम ब्लावात्च्का  (इंग्रजी उच्चारानुसार हेलेना ब्लावस्की )  जगभर प्रवास करत असत. त्यांना एक सवय होती. रेल्वे प्रवासात त्या बीयांच्या पिशव्या बाळगत, खिडकीजवळ बसून पिशवीतून बीया बाहेर फेकत. लोक विचारत, "हे काय करताहात?" "मी फुलझाडांच्या बीया विखुरतेय. यातील काही बीया नक्की रुजतील, त्यांची रोपं होतील,...

त्र्यूफोची नजर पाहताना... ०३

Image
 *कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*     त्रूफोची नजर पाहताना... ०१  त्रूफोची नजर पाहताना... ०२ एका कवितेकरता - नव्हे, दोन कवितांकरता - चाली सुचू लागल्या. शाळेनंतर कित्तीतरी वर्षांनी. प्रत्येक पद्य जवळपास अर्धं संगीतबद्ध करून होत नाही तोच माझी सांगीतिक मती कुंठलीय, जागच्या जागी घोटाळतेय. लाटांनी नाव किनाऱ्याकडे ढकलावी, मिठी सोडवून त्याने कूस बदलावी तसंच हेही येऊ घातलेलं असेल, अगदी स्वाभाविक असेल पण मन उगाच हळहळतं. आपण  पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. आपण दुरावल्यावर तो व्याकूळ होणार, समुद्र गर्जत हाका घालणार, नि आपण जवळ आलो की हे असं! 'ज्यूल ए जिम' (English: Jules and Jim) च्या संगीतावर काही लिहावं असं बराच काळ मनात होतं. चित्रपटातील अन्य कुणाहीबद्दल, कशाहीबद्दल बोलू नये, फक्त त्या संगीताबद्दल बोलावं.... तसं व्हायचं नाही परंतु. जिमच्या आठवणीने कोवळं हसू न फुलणं, नजरेचा काटा कातरिन् कडे  न झुकणं कसं शक्य आहे? आणि ज्यूलचा उल्लेख केला नाही, त्याला विचारात घेतलं नाही तरी तो असतोच, असणार. कोंफेस्याँ ओ क्ल...

लाओ-त्सू न्यायप्रमुख होतो तेव्हा...

Image
लाओ-त्सूच्या (ऊर्फ लाओझी / लाओ-त्से) शहाणीवेची ख्याती हळूहळू चीनभर पसरली, चीनच्या सम्राटाच्याही कानांवर गेली. आपली न्यायव्यवस्था या शहाण्या तत्त्वज्ञाच्या हाती असेल  तर... राजानं आपला मनोदय नम्रपणे लाओ-त्सूला कळवला: 'कृपया तुम्ही आपल्या साम्राज्याचे न्यायप्रमुख व्हाल का?' लाओ-त्सूनं वारंवार सांगितलं: 'बाबा रे, तू चुकीच्या माणसाला विचारतो आहेस. हे पद भूषवण्यालायक व्यक्ती मी नव्हे.'  पण सम्राटानं आपला विनवणीवजा आग्रह लावून धरला. अखेर लाओ-त्सू म्हणाला, "ठीक आहे. मी तुझ्या विनंतीचा स्वीकार करतो. पुन्हा एकदा अगदी स्पष्ट सांगतो - माझं न्यायदान तुमच्या पचनी पडेल असं मला वाटत नाही." पहिला दिवस. एका अट्टल दरोडेखोराला न्यायसभेत आणलं गेलं. नगरातील महाधनाढ्य व्यक्तीच्या खजिन्यावर या चोरानं लंबा हात मारला होता. लाओ-त्सूनं संपूर्ण प्रकरण ऐकून घेऊन आपला निर्णय सुनावला: चोर व धनाढ्य व्यक्ती दोघांनाही समान काळासाठी तुरुंगवास! "काय बोलताय काय तुम्ही! माझ्याकडे चोरी झाली, दरोडा पडला तर मलाच शिक्षा? मी का म्हणून कैदेत जावं, तेदेखील चोराइतक्याच काळाकरता? हा कुठला न्य...

गोऱ्यांचं राज्य गेल्यानंतर.. भाग तीन

Image
  रस्किन बॉण्ड यांच्या आत्मवृत्तपर लेखनातील काही अंश     ( भाग एक इथे वाचा ) ( भाग दोन इथे वाचा )   आर्थर फिशर - मागे उरलेल्यांपैकी अजून एक. मात्र तो तगला, बुडाला नाही. देश सोडून जाताना फिशर कुटुंबीय त्याला इथेच टाकून निघून गेले. गोऱ्यांच्या राज्याचे असे 'जिवंत अवशेष' हे सामान्यतः अशिक्षित, मनदुबळे मुलगे असत. यांना कोणी आप्तस्वकीय नसत, आधाराला आपलं माणूस नसे. इंग्रजांना आपल्या अनौरस संततीबद्दल फारशी पर्वा नव्हती. आर्थर फिशरच्या सुदैवाने गार्ल बहिणींनी त्याला आश्रय दिला. या अँग्लो-इंडियन, अविवाहिता भगिनी पूर्वी शाळाशिक्षिका होत्या. त्या छोटेखानी बोर्डिंग हाउस चालवत असत. आर्थर त्यांच्या आउटहाउसमधे राहत असे, त्यांची छोटीमोठी कामं  करत असे. शिक्षण म्हणाल तर त्याला आपलं नाव तेवढं लिहिता येई, पण त्याच्या हातांत कसब होतं. आयत्यावेळी प्लायवूडची स्वस्तातील शवपेटी बनवण्यात इथल्या दफनयोजकाला आर्थरची बऱ्याचदा मदत होत असे.  रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांचा आर्थर लाडका होता. तो मुलांसंगे गोट्या खेळत असे, त्यांना भवऱ्याला गिरकी देण्यास शिकवत असे - मोबाईलवर चालणाऱ्या ...

गोऱ्यांचं राज्य गेल्यानंतर.. भाग दोन

Image
  रस्किन बॉण्ड यांच्या आत्मवृत्तपर लेखनातील काही अंश     ( भाग एक इथे वाचा ) आणखी तो फॉस्टर बाबा - स्कॉटलंडच्या बॉनी प्रिन्स चार्लीचे आपण वंशज असल्याचा त्याचा दावा होता.  'टेल्स ऑफ फॉस्टरगंज ' या सुरस कादंबरीत मी फॉस्टरची कहाणी सांगितली आहे. 'फॉस्टरगंज' म्हणजे खरंतर 'बार्लोगंज', मसुरीतील एक उपनगर आहे ते. फॉस्टर वस्तुतः स्किनर कुटुंबाशी संबंधित होता, इंग्रजांच्या राज्यातील बऱ्यापैकी प्रतिष्ठित असा हा परिवार. मॉसी फॉल्सच्या दिशेने जाणाऱ्या उतारावर फॉस्टरच्या मालकीची थोडीथोडकी जमीन होती. वर्षानुवर्षं व्यसन केल्यामुळे तो शारीरिक व आर्थिकदृष्ट्या पिचला होता. बहुतेकदा तो दारुच्या नशेत तर्र होऊन पडलेला असे. फॉस्टर आपल्या सावत्र बहिणीसोबत राहत असे. तीसुद्धा दारुबाज होती. दोघांमधे 'तसले' संबंध असल्याची बोलवा होती. कालांतराने दोघांनी पुष्कळशी जमीन विकली, घराच्या छतावरचे पत्रे विकले, बरंचसं फर्निचरही विकून टाकलं. शेवटी ती दोघे पूर्वी जिथे तबेला होता तिथे, आउटहाउसमधे राहू लागली.  तुलनेनं सुस्थितीत असलेल्या अँग्लो-इंडियन्स व भारतीय ख्रिश्चनांनी हालाखीत ज...

गोऱ्यांचं राज्य गेल्यानंतर.. भाग एक

Image
रस्किन बॉण्ड यांच्या आत्मवृत्तपर लेखनातील काही अंश ...१९५० साली माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं तेव्हा बहुतांश इंग्रज व अँग्लो-इंडियन मुलं शाळा सोडून गेली होती. त्यांचे कुटुंबीय इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंडला स्थलांतरित होत होते. मुस्लिम मुलं (-एकूण विद्यार्थीसंख्येच्या एक तृतीयांश मुलं) १९४७मधे, फाळणीच्या वेळीच निघून गेली होती. सबंध उत्तर भारतात, नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानातही तेव्हा भीषण रक्तपात झाला. ही मुलं शाळेत बरीच लोकप्रिय होती. पैकी बहुतेक जण पठाण होते -  माझे मित्र अजहर व उमरसुद्धा. शिमल्यात जागोजाग दंगे उसळले तेव्हा या मुलांना सैन्याच्या ट्रक्समधून न्यावं लागलं. मुलं सुखरूप आपापल्या घरी पहोचली. त्यांच्या जाण्यानं शाळेत मात्र पोकळी निर्माण झाली. पटसंख्येत एकाएकी घट झाली, तीतून सावरण्यास शाळेला दोन-तीन वर्षं लागली. दरम्यान अनेक शीख मुलं शाळेत दाखल झाल्यामुळे ही पोकळी भरून निघाली.  अँग्लो-इंडियन परिवारांचे थवेच्या थवे माझ्या मूळ शहरातून म्हणजे डेहराडूनमधून काढता पाय घेत होते. श्रीमंत लोक आपल्या प्रवासाची तजवीज स्वतःच करत. ज्यांना प्रवासखर्च परवडणा...

अर्सूला के. लं ग्विन - काही उद्गार

Image
जग सत्कारणी लावायचं असेल; जगाची व जगात व्यतीत होणाऱ्या आपल्या काळाची उधळमाख थांबवायची असेल तर 'या जगात असावं कसं' हे आपण पुन्हा नव्याने शिकून घ्यायला हवं. जगण्याचं कसब; आपण इथलेच, या विश्वाचेच असल्याचं भान; विश्वाचा एक अंश असण्यातला अत्यानंद या साऱ्यात नित्य जाणीव अंतर्भूत असते - पशुमात्रांशी एक पशू म्हणून, भूतजीवांशी एक जीव म्हणून, पदार्थवस्तूंशी एक पदार्थवस्तू म्हणून आपलं जे सख्य असतं, नातं असतं त्याची जाणीव. झाडं, नद्या, टेकड्यांना सहचरांच्या, आप्तेष्टांच्या गोतावळ्यात सामावून घेऊ शकलो तर कदाचित आपण त्यांच्याकडे निव्वळ 'नैसर्गिक संसाधनं' म्हणून पाहणार नाही. मला वाटतं मी अखिल सृष्टीला विषयरूप देण्याचा, तिला आपलं म्हणण्याचा प्रयत्न करतेय, कारण तिला स्वतःवेगळं काढल्याने, तिचं ठोस वस्तूकरण केल्याने आपण कुठे येऊन पडलोत पहा ना! ताब्यात घेणं, पादाक्रांत करणं, पिळवणूक इतकाच फक्त 'आपलं म्हणण्या'चा अर्थ नव्हे. ही आपणवणूक मन व कल्पनाशक्तीपल्याड मोठी झेप घेण्याशी निगडित असू शकते. ...विज्ञान बाह्यात्काराचं अचूक वर्णन करतं. कविता अभ्यंतराचं स्पष्टवर्णन करते. विज्ञान विवेच...

The difference

The 'world' is out of question, out of danger. It has known a great deal. Above all to spin, to adorn itself with passage of things adorning, with itself, each passing thing. It feeds on much we love and loath, much, in other words, we don't know : 'good' and 'foul' and 'fast' and 'more' are holes in our begging-bowl. We were in danger, we shall be guided by self-surity An eyed man doubts not his sight Anyone breathing brags himself alive Shielded in ambition, he is ready to miss The ethereal arrow. Would you, say, with goods galore, kin more than many, reckon yourself buried already? Would I; quarrying outcome, fondling praise or pearls of concord, suspect myself lost? 'Our' world is in danger - heartless doings, countless, one atop another in collective effort to fill bottomless pits to tuck the abysses neat and fringe bare existence with meaning ankles to feet! In the world voids brim with ghostly stars, heavenly waters; are ramme...