विचार मौलिक (original) असतच नाहीत, अनुभूती मौलिक असते
* हे भाषांतर माझं नाही.* प्रश्न: एकीकडे आपण गीता, बायबल, कुराण आदी धर्मग्रंथांद्वारे प्रतिपादित धर्म मानत नाही. मग त्यांचे विचार का म्हणून चोरता? रजनीश (ओशो) : ...काही दिवसांपूर्वी जे. कृष्णमूर्तींच्या एका अनुयायाचं पत्रं आलं. माझ्या विचारांमध्ये कृष्णमूर्तींच्या विचारांची झलक दिसते असं त्याचं म्हणणं आहे. स्वाभाविक आहे. पण हेदेखील लक्षात घ्या, की कृष्णमूर्तींच्या बोलण्यात बुद्धाची झलक आहे, लाओ त्सूची झलक आहे, उपनिषदांची छाप आहे. त्यांच्या विचारांमध्ये झेन गुरुंची पुनरुक्ति आहे. याचा अर्थ 'कृष्णमूर्तींनी उपनिषदांतून विचार चोरले' असा घ्यावा का? - नाही, तसं म्हणणं चुकीचं ठरेल. माझी तर अशी धारणा आहे, की विचार मौलिक असतच नाहीत. भाषा मौलिक असतच नाही. 'मौलिक' (original) या शब्दाचा अर्थ समजावून घ्या. 'मौलिक' म्हणजे मुळापासून, उगमापासून, स्रोतापासून आलेलं. शब्द मौलिक नाहीत, ते शतकानुशतकांच्या परंपरेतून आलेले आहेत. पण शब्दांचा वापर करावा लागतो, बोलावं तर भाषेतच लागतं! त्याला इलाज नाही. दुर्दैव असं, की भाषेची वस्त्र चढवू लागताच अनुभूती गायब होते, लुप्त होते. ज्याला ख...