जगात दोन प्रकारच्या विचारधारा अस्तित्वात आहेत. एक म्हणते, स्वतःच्या इच्छेनुसार, संकल्पानुसार वाट्टेल ते करण्याचं स्वातंत्र्य – free will - माणसाला लाभलं आहे. ही कल्पना मुळातच असत्य असल्याने तीविरोधात युक्तिवाद होऊ शकतो, तसा तो केलाही जातो अन् मग पूर्णतः विरोधी भूमिका घेतली जाते, जी म्हणजे ‘ कोणीही स्वतंत्र नाही. आपण कळसूत्री बाहुल्या आहोत, आपली सूत्रं अज्ञाताच्या हातात आहेत. आपण तर केवळ गुलाम आहोत’. दोन्ही विचारधारा असत्य आहेत. आपण गुलाम नसतो व स्वतंत्रदेखील नसतो. ...समजून घ्यायला जरा कठीण आहे. कारण आपण ‘आपण’ नसतोच, मी केवळ ‘मी’ नसतो, तर पूर्णत्वाचा (wholeness) एक अंश असतो. तुम्ही स्वत:ला पूर्णत्वापासून तोडू पहाल, पृथक करू पहाल, तर तुम्ही व सृष्टी यांमध्ये संघर्ष निर्माण होईल; तुम्हाला कशाच्यातरी आधीन असल्यासारखं वाटेल, एकाकी, असहाय वाटेल. तुम्ही स्वत:ला पूर्णत्वाचा एक भाग म्हणून समजून घेतलंत तर तुम्ही स्वामी असाल, मात्र पूर्णत्वा‘सह’ स्वामी - पूर्णत्वा‘चे’ स्वामी नव्हे. मुक्तेच्छा, संकल्पशक्ती (free will) असं काही नसतं, आणि प्राक्तन (fate) असंही काही नसतं. अवलंबिता, स...